मुलाच्या प्रशिक्षकासोबत 4 / मुलाच्या प्रशिक्षकासोबत 4 वर्षांपासून फिरत होती विवाहिता, त्याने दिली अश्लील फोटो व्हायरल करण्‍याची धमकी, मग घडले असे काही

Jan 03,2019 06:59:00 PM IST
पुणे- एका 35 वर्षीय विवाहित महिलेचे आपल्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने एका महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेचा पती विनोद वाघ (45) यांनी आरोपी आशिष वसंत धिवार (29) याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे 17 वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिला 15 वर्षांचा एक मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा मुलगा गणेशोत्सवाच्या काळात ढोल-ताशा शिकण्यासाठी जात होता. त्यावेळी मुलासोबत जात असलेल्या महिलेची आशिष धिवार याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघात मैत्री झाल्याने ते फिरण्यास जात होते. त्यावेळी शंकर याने त्याच्या मोबाइलमध्ये महिलेसोबत काही फोटो काढले. या फोटोंच्या आधारे शंकरने महिलेस ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध कर अन्यथा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करेन', अशी धमकी दिली. तसेच महिलेने नकार दिल्यास संबंधित फोटो पतीस दाखवून संसार उद‌्ध्वस्त करू, असेही त्याने सांगितले होते. शंकर याच्या पत्नीसही त्याची दुसऱ्या एका महिलेसोबत मैत्री असल्याची कुणकुण लागल्याने याबाबत तिनेही त्यास जाब विचारला होता. त्यानंतर दोन्ही घरात याबाबतची माहिती झाल्यावर मृत महिलेने शंकरसोबत केवळ मैत्री असल्याचे सांगितल्याने वादावर पडदा पडला होता. मात्र, तरीही आरोपी शंकर हा महिलेस वारंवार तिच्यासोबतचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत होता. त्यामुळे महिलेने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस पुढील तपास करत आहे.

X