आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Married Women Teased By Brother in law Commits Suicide In Hoshiarpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीर ठेवायचा वाईट नजर, करायचा अभद्र कॉमेंट्स, लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर भावजयीने उचलले हे पाऊल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर - इंटरनॅशनल महिला फुटबॉल खेळाडू मनीषा कल्याणची बहीण ममताने सासरच्या छळाला कंटाळून गळफास लावला. ममताचा दीर तिच्यावर वाईट कॉमेंट्स करायचा, यामुळे त्रस्त होऊन तिने आत्महत्या केली.

मृत ममताच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, तिचा दीर तिच्यावर वाईट नजर ठेवायचा आणि यामुळेच ममताने हे पाऊल उचलले. पोलिसांनी ममताचे वडील नरिंदर पाल सिंह यांच्या जबाबावरून मृत महिलेचा पती इंद्रजित सिंह, दीर हरतिंदर सिंह, दविंदर कुमार, रेशम सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

रुग्णालयात मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी पोहोचलेल्या मनीषाने सांगितले की, तिची बहीण ममताचे लग्न इंद्रजीतसोबत 13 ऑक्टोबर रोजी झाले होते. ममता आणि इंद्रजित यांचे आपसात प्रेम होते आणि कुटुंबाच्या रजामंदीने त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ममतावर तिचा दीर हरतिंदर सिंह वाईट नजर ठेवायचा. 

 

ममताने याबाबत त्यालाही सांगितले होते, नंतर मिटवा-मिटवी झाली होती आणि ममताच्या सासऱ्याने तिच्या दिराला रागावले होते, परंतु ममता त्रस्त राहू लागली होती. मनीषाने बहिणीला समजावले की, जर तो ऐकत नसेल तर पोलिसांत तक्रार कर, परंतु तिचे सासरे प्रकरण बाहेर जाऊ द्यायचे नाही म्हणाले म्हणून तिनेही टाळले.

 

मनीषाने सांगितले की, आदल्या दिवशी सकाळी ममताचा फोन आला होता तेव्हा ती खुश होती, खूप गप्पा झाल्या. संध्याकाळी ममताच्या शेजारी राहणारे चन्नण सिंह यांनी फोन केला की, ममताची तब्येत खूप खराब आहे. जेव्हा ते ममताच्या सासरी पोहोचले तेव्हा कळले की, ममताने गळफास लावून आत्महत्या केली आहे.