आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marriott Plans To Launch Six International Hotels In Five Years

मॅरियटची ५ वर्षांत १२० आंतरराष्ट्रीय स्तराचे हाॅटेल्स सुरू करण्याची याेजना, लहान शहरांतही नोकऱ्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे याेगदान देणाऱ्या हाॅस्पिटॅलिटी उद्याेगात नाेकऱ्यांची शक्यता वाढली आहे. संवादशैली आणि सेवाभावाच्या या उद्याेगात सन २०२८ पर्यंत १ काेटी नवीन राेजगार निर्माण हाेऊ शकतात. येत्या ३ वर्षांत १२ आंतरराष्ट्रीय हाॅटेल चेन भारतात येऊ शकतात. जाॅब व करिअर वृद्धीसंदर्भात “दैनिक भास्कर’ने कंपनीचे दक्षिण आशिया विभागाचे मनुष्यबळ विकास सीनियर एरिया डायरेक्टर गुरमित सिंह यांच्याशी चर्चा केली.
 

> सद्य:स्थितीत हाॅटेल उद्याेगात काेणत्या प्रकारचा राेजगार आहेॽ
आमच्याकडे विविध प्रकारच्या काैशल्याचे लाेक साेबत काम करतात. आमच्याकडे इंजिनिअरिंग, फायनान्स, ह्यूमन रिसाेर्स, रेव्हेन्यू मॅनेजमेंट, सेल्स अँड मार्केटिंग, आॅपरेशन्स, टेक्नाॅलाॅजी आदींची पदे आहेत. एचआर, वित्त, इंजिनिअरिंग, विक्री आणि मार्केटिंगसारख्या कामासाठी आम्ही संबंधित क्षेत्रात बॅचलरची पदवी किंवा पीजीची पदवी ही पात्रता आहे. आतिथ्य व्यवस्थापनात डिप्लाेमा किंवा पदवीसाेबत प्रवेश स्तरावरील पदांसाठी उच्च माध्यमिक पदवी ही किमान पात्रता आवश्यक आहे.


> मॅरियटमध्ये भरती प्रक्रिया कशीॽ कॅम्पस प्लेसमेंटचे अतिरिक्त जाॅबसाठीही अर्ज केला जाऊ शकता
ेॽ
आमचे स्वत:चे जाॅब पाेर्ट मॅरियट करिअर आहे. यासाेबत कॅम्पस रिक्रुटमेंटचा ग्लाेबल युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट डेव्हलपमेंट प्राेग्रामही आहे. याला व्हॉएज नावाने आेळखले जाते. अनेक हाॅटेल्ससाेबत आम्ही आमच्या सहकाऱ्यांना क्राॅस ट्रेनिंग/ टास्क फाेर्स असाइनमेंट/ प्री- आेपनिंग सहायकाची संधी देताे.


> नाेकरी हवी असणाऱ्यांनी मुलााखतीसाठी कसे तयार कराव
े?
मॅरियट संस्कृतीची ही ५ मूल्ये म्हणजे आपल्या लोकांना प्राधान्य, सर्वोत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे, परिवर्तनात बदल, प्रामाणिकपणे काम करणे, आपल्या जगाची सेवा करण्यावर आधारित आहे. आम्ही प्रतिभेच्या शोधात या मूल्यांचा शोध घेतो.

> सद्य:स्थितीत एआय आणि बिग डेटा किती परिणामकारक आहेॽ
एआय आमच्या उद्याेग संचालनाची पद्धत बदलेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत महसूल व्यवस्थापक नावाचा काेणताही विभाग नव्हता. सध्या हा आमच्या उद्याेगाचा अविभाज्य भाग आहे. आता पाहुणे सर्व सुविधांचा लाभ काेणाशी न बाेलता उचलू शकतात.

> भविष्यात या क्षेत्रात नाेकऱ्यांची किती शक्यता आहे हे सांगू शकाल कायॽ
भारत येत्या १० वर्षांत महाशक्ती हाेण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी ट्रॅव्हल, बिझनेस आणि सुट्यांना केवळ महानगर शहरांमध्येच नव्हे तर टियर २ आणि टियर ३ शहरांमध्येही हाॅटेल उद्याेगाच्या संधी वाढतील. सध्या आम्ही नागपूर, रायपूर, विलासपूर, श्रीपेरुम्बदूरसारख्या अनेक शहरांत जात आहाेत.

> अलीकडच्या वर्षांतील भरती प्रक्रियेत काही बदल झालाॽ
उमेदवारांकडे निवडीचे अनेक पर्याय आहेत, अशा जगात आपण जात आहाेत. आम्ही मॅरियटमध्ये माेबाइल फ्रेंडली अॅपद्वारे आॅनलाइन अर्ज प्रक्रिया अवलंबिताे. यामुळे आम्हाला कामावर ठेवण्याच्या प्रक्रिया व्यवस्थापनाच्या कुशल पद्धती मिळतात. आता कंपन्या आणि उमेदवार थेट व्हाॅट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर, लिंक्डइन आणि अन्य प्लॅटफार्मच्या माध्यमातून पाेहाेचताे. मुलाखत आता एका खाेलीत घेतली जात नाही. ही लाॅबी, एका रेस्तराँ किंवा चालत-फिरत हाेऊ शकते.
 

२०२८ पर्यंत ५ काेटींना राेजगार देईल हाॅस्पिटॅलिटी
>  २०२८ पर्यंत ५.२३ काेटी लाेकांना राेजगार मिळण्याची शक्यता.
> भारतात सन २०२० पर्यंत इंटरनॅशनल हाॅटेल चेनचा वाटा ४७ टक्के आणि २०२२ पर्यंत ५० टक्के हाेईल.
> स्टार्टअप्स आणि आॅनलाइनने टियर-२ आणि ३ मध्ये मागणी वाढण्याची शक्यता.
> सन २०१८ मध्ये १.५६ विदेशी पर्यटक भारतात आले. २०२८ पर्यंत संख्या ३.०५ काेटी हाेईल.
>  भारतात खाेल्यांची मागणी ६.८ टक्क्यांनी वाढत आहे, पुरवठा केवळ ३ टक्के आहे.

यामध्ये रोजगाराच्या संधी
मार्केटिंग आॅफ सर्व्हिसेस, इव्हेंट मॅनेजमेंट, हाॅस्पिटॅलिटी लाॅ फॅसिलिटी प्लॅनिंग, डायरेक्टर आॅफ हाॅटेल आॅपरेशन्स, शेफ {फ्लाेअर सुपरवायझर,  हाऊसकीपिंग, मॅनेजर गेस्ट सर्व्हिस,  सुपरवायझर वेडिंग काे-आॅर्डिनेटर, सर्व्हिस मॅनेजर,  फूड अँड बेव्हरेज मॅनेजर,  फ्रंट आॅफिस मॅनेजर