Home | National | Delhi | Marshall will be able to test the ticket at the railway station

रेल्वे स्टेशनवर मार्शल करणार तिकीट तपासणी; जागतिक स्तरावरील सुविधा देण्यासाठी नियोजित 50 स्टेशन्सवर होणार कामे 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 13, 2019, 08:07 AM IST

खासगी कंपनी निश्चित करणार पार्किंग व प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 

 • Marshall will be able to test the ticket at the railway station

  नवी दिल्ली- फुकटे प्रवासी नेहमीच रेल्वे विभागासाठी डोकेदुखीचा विषय ठरले आहेत. या समस्येवर रेल्वे मंत्रालयाने नवीन शक्कल लढवली असून देशभरात उभारल्या जाणाऱ्या जागतिक स्तराच्या रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणीसाठी मार्शलची नियुक्ती केली जाईल. टीटीईसोबत हे मार्शल स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून रेल्वे पोलिसांकडे सोपवतील. मार्शलना फक्त प्लॅटफॉर्म तिकीट तपासण्याचा अधिकार असेल.

  प्रवाशांना उत्तम सुविधा मिळाव्यात म्हणून प्रथमच ही कवायत केली जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर हे काम चालेल. देशभरात जवळपास ५० स्थानकांवर जागतिक स्तरावरील सुविधा दिल्या जातील. यात ४३ स्थानके निश्चित करण्यात आली. इंडियन रेल्वेस्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) नुसार या स्थानकांना इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट कॉर्पोरेशन (ईपीसी) व खासगी सार्वजनिक भागीदारीअंतर्गत विकसित केले जाईल. यातील जी स्थानके ईपीसीअंतर्गत विकसित केले जातील तेथे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचा अधिकार आयआरएसडीसीकडे असेल. खासगी कंपन्यांकडून मार्शल घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आयआरएसडीसीचे एमडी एस.के. लोहिया म्हणाले.

  खासगी कंपनी निश्चित करणार पार्किंग व प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर
  पीपीपी अंतर्गत रेल्वेत खासगी कंपन्यांना प्लॅटफॉर्म तिकीट, पार्किंगचे दर निश्चितीचा अधिकार असेल. कंपनी मार्शलची नियुक्ती करेल. मार्शल रेल्वे सुरक्षा दलासोबत समन्वय साधतील. प्रवाशांची गर्दी हाताळण्याचे कामही ते करतील. कंपन्यांना प्लॅटफॉर्मवर स्टॉल लावणे किंवा खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर विकास कर तसेच शौचालय वापरासाठी शुल्क आकारण्याची सूट त्यांना असेल.

  मुंबई सेंट्रल, भुसावळ, वर्धा स्थानकांवर जागतिक सुविधा
  जागतिक स्तरावरील सुविधा उपलब्ध करण्यासाठी इंदूर, उदयपूर, भुसावळ, वर्धा, जालंधर, लुधियाना, गुरगाव, दिल्ली कँट, आदर्शनगर दिल्ली, फरिदाबाद, अंबाला कँट, अंधेरी, बोरिवली, कल्याण, अहमदाबाद, बोकारो स्टील सिटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल, रांची, अजमेर, जयपूर, गांधीनगर-जयपूर, आग्रा कँट, अलाहाबाद या स्थानकांची निवड झाली.

Trending