Monday Positive / मार्टाने खेळावे असे कुटुंबाला वाटत नव्हते; जिद्दीने खेळत राहिली, आज वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गाेल केले

ब्राझीलची मार्टा सहा वेळा वुमन प्लेअर ऑफ द इयर

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 24,2019 10:37:00 AM IST

फ्रान्समध्ये महिलांचा फुटबाॅल विश्वकप सुरू आहे. या विश्वचषकात आतापर्यंत सर्वात जास्त चर्चेत १७ गाेल करणारी मार्टा आहे. तिचे संपूर्ण नाव मार्टा व्हियरा डिसिल्व्हा आहे. ३३ वर्षीय मार्टाने ६ वेळा फिफा वुमन प्लेअर आॅफ द इयर (२००६-१०,२०१८)चा किताब जिंकला आहे.


ब्राझीलमध्ये १९४१ पासून १९७९ पर्यंत महिला व मुलींसाठी फुटबाॅल खेळण्यावर बंदी हाेती. यानंतरही सामाजिकदृष्ट्या हा खेळ महिलांसाठी सर्वसाधारण नव्हता. मात्र, डिआे रिकाे भागात वाढलेल्या मार्टाने वयाच्या ७-८ व्या वर्षापासूनच हा खेळ खेळण्याची जिद्द बाळगली. त्या वेळी मुलींना शाळेत फुटबाॅल खेळू दिले जात नव्हते. मार्टा भावांसाेबत रस्त्यावर फुटबाॅल खेळत असे तेव्हा आसपासचे लाेकही विराेध करत.

कुटुंबीयही आडवे येत. मात्र, मार्टा थांबली नाही. १४ व्या वर्षीच तिला स्थानिक क्लबमध्ये सहभागी हाेण्याची आॅफर मिळाली. आज खेळण्याचा निर्णय घेतल्यास अन्य मुलींसाठी हा मार्ग माेकळा हाेईल याची जाणीव तिला हाेती. तिने प्रस्ताव स्वीकारला. सध्या मार्टा ब्राझीलच्या महिला फुटबाॅल संघाची कर्णधार आहे. मार्टा यूएनची सदिच्छा दूत आहे.

जगभरातील मुलींनी धैर्याने कठीण निर्णय घ्यावेत यासाठी आपली कहाणी त्यांच्यापर्यंत पाेहाेचवली जावी अशी तिची इच्छा आहे. ती म्हणाली, आपल्या खेळातील कारकीर्दीतून वचनबद्धता, प्रतिभा आणि दृढता यातून सर्वकाही प्राप्त केले जाऊ शकते हे दिसून येते. खेळ जागतिक भा‌षा असून सर्वांना प्रोत्साहन देताे. या माध्यमातून आपण सीमारेषा आेलांडून ती एक करण्यास मदत करतो. मार्टा स्थानिक स्तरावर मुलींना फुटबाॅलचे प्रशिक्षणही देत आहे.

X
COMMENT