आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ALTO पेक्षा ज्‍यास्त मायलेज देईल Maruti-Toyota ची ही नवीन हायब्रिड कार, जाणून घ्या फीचर आणि लाँचिंगची तारीख...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- मारुति सुजुकी लिमिटेड (Maruti Suzuki) 2020 मध्ये अशी सिडान कार आणण्याची योजना करत आहे, जी फर्स्‍ट स्‍ट्रांग किंवा फूल हायब्रिड असेल. आतापर्यंत मारुतिची फूल हायब्रिड कार भारतात उपवब्ध नाहीये. या कारला सुजुकी आणि टोयोटाच्या संयुक्‍त विद्यमाने विकसित केले जाऊ शकते. याची घोषणा आधीच झाली आहे की, टोयोटा कोरोला सेडानची इंजीनिअरिंग मारुतिसोबत होईल. इंडस्‍ट्री एक्‍सपर्टचे म्हणने आहे की, मारुतिची ही पहिली फूल हायब्रिड कार असेल. 

 

काय आहे कंपनीची योजना?
सुजुकी आणि टोयोटा भारतामध्ये हायब्रिड टेक्‍नोलॉजीच्या विकासावर सोबत काम करत आहे. एका मिडिया रिपोर्टमध्ये मारुति सुजुकीकडून सांगण्यात आले की, हायब्रिड पॉवर टरेन इंजनने कारचे मायलेज 30% वाढेल. एप्रिल 2020 मध्ये BS6 एमिशन नॉर्म्‍स लागु झाल्यानंतर कंपनी डीझेल कारचे उत्पादन बंद करणार आहे, कारण एमिशन नॉर्म्‍सच्या आधारावर डीझेल कारची किंमत अंदाडे अडिच लाखांपर्यंत वाढेल. सध्याच्या स्थितीत पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमतीत 1 लाखांचा फरक आहे. 


कसे काम करेल हायब्रिड इंजिन?
हायब्रिड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि पारंपरिक इंजिन असेल, जे कारला पॉवर देते. ही हायब्रिड कार 3 प्रकारच्या असतात: माइल्‍ड हायब्रिड फुल हायब्रिड आणि प्‍लग इन हायब्रिड. फुल हायब्रिड कार यूनीक असते कारण ती पारंपारीक इंजिनवर नाही तर बॅटरीवर चालते. कारचा वेग कमी झाल्यावर इलेक्ट्रिक मोटर काम करणे सुरू होते. यात कारचे मायलेज वाढते. कार थांबल्यानंतर गॅस इंजिन करणे सुरू होते. यामुळेच शहरात थांबून-थांबून कार चालवल्यावर सुद्धा चांगले मायलेज मिळेल.


किती असेल मायलेज?
फुल हायब्रिड कारचे मायलेज विना हायब्रिड कारपेक्षा खुप जास्त असेल. म्हणजेच टोयोटा प्रियस आधापासूनच फुल हायब्रिड तंत्रज्ञासोबत येत आहे. फोर्ड कंपनीपण अशा प्रकारच्या कार बनवते. या कारचे वजन खुप कमी असते. त्यामुळे कमी इंधनात चांगले मायलेज मिळते.


बॅटरी कशी चार्ज होते?
हायब्रिड कार्सची बॅटरी रिचार्ज करण्याची गरज नसते. कंपन्या कारमध्ये असे तंत्रज्ञान देते ज्यामुळे चालवतानाच रिचार्ज होते. कार स्‍लो झाल्यार पॉवर बॅटरीला मिळते ज्यामुळे ती परत चार्ज होते.

बातम्या आणखी आहेत...