आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीच्या कार 10 हजार रुपयांपर्यंत महागल्या; कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, तसेच डॉलरच्या घसरणीमुळे कंपनीने घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मारुती सुझुकीने त्यांच्या काही मॉडेलच्या कारच्या किमतीत १० हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया स्वस्त झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. किमतीमधील ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे.

 

अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आर्टिगाच्या नव्या मॉडेलच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही. मारुतीने जानेवारीत गाड्यांच्या किमती वाढवणार असल्याचे डिसेंबरमध्येच सांगितले होते. मात्र, दरात किती वाढ होईल याची माहिती दिली नव्हती. इतरही कंपन्यांनी जानेवारीत दरवाढ करणार असल्याची घोषणा केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...