आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maruti सोबत बिझनेस करण्याची संधी, छोट्या गुंतवणुकीत दर महिना होईल मोठी कमाई...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- तुम्हालाही कमी गुंतवणुकीत जास्ती इनकम असलेला चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारुति सुजुकी लिमिटेड या वर्षी आपल्यासोबत व्यवसायीकांना जोडण्याची प्लॅनिंग करत आहे. कंपनीने या वर्षी आपल्या विक्री नेटवर्कची योजना बनवली आहे, यांत डिलरशीप देखील सामील आहे. कंपनी पूर्ण देशात नवीन डिलर्स बनवण्याच्या तयारीत आहे. देशभरात मारुतिचे 2625 डीलर्स आहेत. कंपनीला येणाऱ्या काळात 250 डिलर्स वाढवायचे आहेत. 
 

कसा करायचा डीलरशीपसाठी अर्ज
तुम्हालाही मारुतिचा डीलर बनायचे आहे तर कंपनीसोबत थेट संपर्क करावा लागेल. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मारुति सुजुकीची वेबसाइट www.marutisuzuki.com वर जावे लागेल. या पेजवर एक कॉलम कॉरपोरेटचा दिला आहे, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन येतील, त्यातील डीलर रिक्वायरमेंटचे ऑप्शन निवडा. त्यानंतर एक अर्ज ओपन होईल, तो अर्ज भरा.


ही माहिती द्यावी लागेल
पर्सनल डिटेल (नाव, डेट ऑफ बर्थ, जॉब)
कांटॅक्ट नंबर
अॅड्रेस
मेलिंग अॅड्रेस
कोणत्या शहरासाठी डीलरशीप हवी आहे
शोरूमचा फोटो
3 वर्षांची बँलेंसशीट
टॅक्स रिटर्नची कॉपी
कंपनीच्या नावाने 1 लाखांचा डिमांड ड्राफ्ट


तुमचे सलेक्शन झाले नाही तर तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला परत  मिळतील, पण जर सलेक्शन झाले तर इतर रक्क्म तुम्हाला एक हाती भरावी लागेल.


मारुति तुमच्या डीलरशीपचा निर्णय घेणार 
तुम्हाला डीलरशिप मिळेल का नाही, हे मारुतिचे मॅनेजमेंट फिक्स करणार. तुमची जागा आणि त्या परिसरातील विक्री पाहूनच डीलरशीपचा निर्णय होईल.

बातम्या आणखी आहेत...