आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Maruti Suzuki Ignis : मारुतीने बंद केले इग्निसचे प्रॉडक्शन, जुन्या मॉडेलवर 1 लाखाचा डिस्काउंट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - मारुती-सुझुकीने आपली प्रीमिअम हॅचबॅक कार इग्निसचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या मॉडेलच्या बदल्यात नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच जुन्या मॉडेल्सची विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक संपवण्यासाठी आता कंपनी ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. कंपनीकडून नेक्सा शोरुममध्ये या कारची विक्री सध्या सुरू आहे. इग्निसची विक्री मारुतीच्या दुसऱ्या कारच्या तुलनेत खूप कमी आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यात फक्त 2500 युनिट्स विकले. एक्स शोरुममध्ये इग्निसची किंमत 4,66,509 रुपये आहे. आता डिस्काउंटसह ही कार 3,66,509 रुपयांत मिळू शकेल.


डीझेल मॉडेल आधीच बंद
जून 2018 मध्ये मारुतीने इग्निसचे डीझेल मॉडेल बंद केले होते. इग्निसची मागणी कमी झाल्याने डीझेल मॉडेल बंद करत असल्याचे स्पष्टीकरण मारुतीने दिले होते. इग्निसच्या डीझेल व्हॅरिएंटची मागणी फक्त 10 टक्के होते. त्यामुळे, कंपनीने हा निर्णय घेतला.


इग्निस 2018 चे स्पेसिफिकेशन
> कारमध्ये 1197cc चे 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. ज्यातून मॅक्सिमम पॉवर 61@6000 आणि टॉर्क 113@4200 मिळेल.
> कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात मॅनुअल आणि ऑटोमॅटिक असे पर्याय आहेत.
> कंपनीचा दावा आहे की लिटर पेट्रोलमध्ये ही कार सरासरी 20.89km मायलेज देऊ शकते.
> यात स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे, ज्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
> इग्निस 9 कलर व्हॅरिएंटमध्ये येते.
> सेफ्टीसाठी यामध्ये ABS आणि EBD देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...