आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 10 कार, ऑगस्टमध्ये Honda Amaze चीही झाली आहे एंट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टॉप 10 सेलिंग पॅसेंजर व्हेइकल्सच्या यादीत देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया (MSI) चा वरचष्मा कायम आहे. ऑगस्टच्या 10 सर्वाधिक विकणाऱ्या कारमध्ये 6 कार मारुतीच्या आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात मारुतीची एंट्री लेव्हल कार Alto पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाची विक्री होणआरी कार बनली आहे. कंपनीने Alto च्या 22,237 कार विकल्या आहेत. गेल्यावर्षी अल्टो 21521 यूनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होती. तर यावेळी लिस्टमध्ये Honda ची कॉम्पॅक्ट सेडान कार Amaze चे नावही आहे. 

 
दुसऱ्या क्रमांकावर Dzire
दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट सेडान Dzire आहे. मारुतीने या कारचे 21,990 युनिट्स विकले आहेत. गेल्यावर्षी हा आकडा 30,934 युनिट्स होता. गेल्यावर्षी ही कार पहिल्या क्रमांकावर होती. 

 
सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आली Swift
मारुती सुझुकी इंडियाची हॅचबॅक कार Swift अगस्त 2018 मध्ये 19,115 यूनिट्ससह तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. 

 
चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरही मारुती 
यावर्षी ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीची प्रिमियम हॅचबॅक कार बलेनो 17,713 युनिट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी कंपनीने बलेनोच्या 17,190 यूनिट्सची विक्री केली होती. पाचव्या स्थानी 13,658 युनिट्ससह वॅगनआरचे नाव आहे. ऑगस्ट 2017 मध्ये कंपनीने वॅगनआरच्या 13,907 युनिट्सची विक्री केली होती. त्याशिवाय सहाव्या क्रमांकावर विटारा ब्रिझाची असून या कारचे 13,271 युनिट्स विकले गेले आहेत. ही कार गेल्यावर्षी चौथ्या क्रमांकावर होती. 

 

पुढे वाचा, ह्युंडईच्या तीन कार.. 


 

बातम्या आणखी आहेत...