Auto Sector / मारुती सुझुकीच्या 3 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर; वाहन विक्री कमी झाल्याचा परिणाम

जुलै महिन्यात मारुतीची विक्री 36% घटली, सणासुदीच्या काळात विक्री वाढण्याची आशा

दिव्य मराठी वेब

Aug 18,2019 04:27:00 PM IST

ऑटो डेस्क - मारुती सुझुकीने तीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आणले आहे. त्यांचे करार वाढवले नाहीत. कंपनीचे चेअरमन आर.सी भार्गव यांच्या मते ऑटो इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मंदीमुळे असे करण्यात आले आहे. पण या मंदीमुळे कायम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आलेली नाही.

वाहन विक्री घटल्यामुळे रोजगारावर झाला परिणाम

> भार्गव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मागणी वाढते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यात येते. मागणी कमी झाल्यावर त्यांना काढण्यात येते. हा उद्योगाचा एक भाग आहे.

> मारुती सुझुकी चेअरमनच्या मते. ऑटोमोबाइल सेक्टर सेल्स, सर्व्हिस, इन्शुरंस, लायसेंसिंग, फायनासिंग, अॅक्सेसिरीज, ड्रायव्हर, पेट्रोल पंप, ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात. वाहनांच्या विक्रीत थोडी जरी घट आली तर नोकऱ्यांवक याचा मोठा परिणाम होतो.

> भार्गव म्हणाले, की चालु आर्थिक वर्षात तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत वाहन विक्रीत सकारात्मक वाढ सुरु झाली. बीएस-VI ट्रांजिशनमुळे पुढील आर्थिक वर्षात विक्री वाढण्याची आशा आहे. मान्सून चांगला राहिल्यामुळे आणि ग्रामीण भागातून मागणी वाढल्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात विक्रीत वाढ होऊ शकते.

ऑटो इंडस्ट्रीबाबत सरकारकडून या आहेत अपेक्षा
सरकारकडून असणाऱ्या अपेक्षांबाबत भार्गव म्हणाले की ऑटो इंडस्ट्रीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्यास परिस्थिती सुधारेल. जीएसटी कमी करणे सरकारवर अवलंबून आहे. प्रदूषण रहित वाहनांना जीएसटीचा फायदा मिळावा असे मला वैयक्तिरित्या वाटते. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील टॅक्स कमी केला पण हायब्रिड कार्सवरील ड्यूटी सुद्धा कमी व्हायला हवी. तसेच सीएनजी वाहनांवरील टॅक्स कमी करावा अशा सरकारकडून अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

X
COMMENT