Home | Business | Auto | Maruti Suzuki Launched Top Variants of New Swift

मारुतीने लाँच केले Swift चे सर्वात अॅडव्हान्स व्हर्जन, 28 पेक्षा जास्त मायलेज, किंमत पूर्वीपेक्षाही कमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 10, 2018, 12:03 AM IST

AGS च्या पेट्रोल व्हेरीएंटची दिल्ली-एक्स शोरूम प्राइज 7.76 लाख आणि डिझेल मॉडेलची प्राइज 8.76 लाख आहे.

 • Maruti Suzuki Launched Top Variants of New Swift

  ऑटो डेस्क - देशातकील अग्रगण्य कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने त्यांची प्रिमियम हॅचबॅक कार स्विफ्ट (Swift)चे आतापर्यंतचे सर्वात अॅडव्हान्स व्हर्जन लाँच केले आहे. या व्हेरीएंटचे वैशिष्ट्य म्हणजे, ही अॅटो गीअर शिफ्ट (AGS) सह मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरीएंटमध्ये ही लाँच करण्यात आली आहे. AGS च्या पेट्रोल व्हेरीएंटची दिल्ली-एक्स शोरूम प्राइज 7.76 लाख आणि डिझेल मॉडेलची प्राइज 8.76 लाख आहे.


  नवे फिचर्स मिळणार
  या टॉप व्हेरीएंटमध्ये डे-टाइम रनिंग LED लाइट्स, LED प्रोजेक्टर हँडलॅम्प्स, लेदर स्टेअरींग व्हील, अॅटो हेडलॅम्प्स, पुश-बटन स्टार्ट, स्मार्ट की, अॅटो क्लायमेट कंट्रोल असे अॅडव्हान्स्ड फिचर्स मिळतील. तसेच म्युझिक लव्हर्ससाठी कारमध्ये 6 स्पिकर्सचे साऊंड सिस्टीम आहे. दुसरीकडे टॉप व्हेरीएंट Z Plus मध्ये 7.0 इंच स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिले आहे. ते अँड्रॉइड अॅटो, अॅपल कारप्ले आणि मिररलिंक कनेक्टीव्हिटीला सपोर्ट करेल.


  सेफ्टी फीचर्स
  या मॉडेलमध्ये कंपनीने अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD)सह ब्रेक असिस्ट, ड्युअल एअरबॅग्स आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर असे फिचर्स दिले आहेत. नव्या स्विफ्टमध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन आहे. सर्व व्हेरीएंट्समध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सुविधा दिलेली आहे. कंपनीचा दावा आहे की, पेट्रोल व्हेरीएंट 22KM आणि डिझेल व्हेरीएंट 28.4KM चा मायलेज देते. नव्या स्विफ्टची स्टार्टींग प्राइज 4.99 लाख आहे.


  भारतात 19 लाख कारची विक्री
  मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह डायरेक्‍टर (मार्केटिंग अँड सेल्‍स) आर.एस. कलसी म्हणाले की, ग्राहकांकडून आम्हाला AGS बाबत फीडबॅक मिळाला होता. त्यानुसार आम्ही टॉप एंड व्हेरीएंट ZXI+ आणि ZDI+ मध्ये AGS ची ऑफर दिली आहे. आम्ही स्विफ्ट ब्रँड अधिक मजबूत करत आहोत. कंपनीने 2005 मध्ये स्विफ्ट लाँच केली होती. आतापर्यंत भारतात 19 स्विफ्ट विकल्या आहेत.

  स्विफ्टच्या व्हेरीएंटच्या किमती

  Variant

  Metallic ()*

  Non-Metallic ()*

  NEW SWIFT LXI ₹4,99,000.00 ₹4,99,000.00
  NEW SWIFT VXI ₹5,87,000.00 ₹5,87,000.00
  NEW SWIFT LDI

  ₹5,99,000.00

  ₹5,99,000.00

  NEW SWIFT VXI AGS

  ₹6,34,000.00 ₹6,34,000.00
  NEW SWIFT ZXI ₹6,49,000.00 ₹6,49,000.00
  NEW SWIFT VDI ₹6,87,000.00 ₹6,87,000.00
  NEW SWIFT ZXI AGS ₹6,96,000.00 ₹6,96,000.00
  NEW SWIFT ZXI+ ₹7,29,000.00 ₹7,29,000.00
  NEW SWIFT VDI AGS ₹7,34,000.00 ₹7,34,000.00
  NEW SWIFT ZDI

  ₹7,49,000.00

  ₹7,49,000.00
  NEW SWIFT ZXI+ AGS ₹7,76,000.00 ₹7,76,000.00
  NEW SWIFT ZDI AGS

  ₹7,96,000.00

  ₹7,96,000.00

  NEW SWIFT ZDI+

  ₹8,29,000.00

  ₹8,29,000.00

  NEW SWIFT ZDI+ AGS

  ₹8,76,000.00 ₹8,76,000.00

 • Maruti Suzuki Launched Top Variants of New Swift

  या मॉडेलमध्ये कंपनीने अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD)सह ब्रेक असिस्ट, ड्युअल एअरबॅग्स आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर असे फिचर्स दिले आहेत. 

 • Maruti Suzuki Launched Top Variants of New Swift

  नव्या स्विफ्टमध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन आहे. सर्व व्हेरीएंट्समध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सुविधा दिलेली आहे. कंपनीचा दावा आहे की, पेट्रोल व्हेरीएंट 22KM आणि डिझेल व्हेरीएंट 28.4KM चा मायलेज देते. नव्या स्विफ्टची स्टार्टींग प्राइज 4.99 लाख आहे. 

Trending