Home | Business | Auto | Maruti Suzuki Offers Exchange Bonus On Vitara Brezza

मारुती पहिल्यांदा आपल्या या कारवर देत आहे डिस्काउंट, होऊ शकते 25 हजारांची बचत...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:28 PM IST

24km चे मायलेज आणि अनेक सेफ्टी फिचर आहेत यात.

 • Maruti Suzuki Offers Exchange Bonus On Vitara Brezza

  ऑटो डेस्क- मारुती सुजुकी आपल्या अनेक कार्सवर ईएर-एंड डिस्काउंट देत आहे. यात कॅश डिस्काउंटसोबतच एक्सचेंज बोनसही मिळत आहे. यातच आता कंपनी पहिल्यांदा लग्झरी विटारा ब्रेजा SUV वर देखील डिस्काउंट देत आहे. कंपनीया कारवर 25 हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. या बोनसचा फायदा दोन पद्धतीने देता येतो. दिल्लीमध्ये या कारची एक्स-शोरूम प्राइज 7,58,190 रूपये आहे. या गाडीला भारतातली स्वस्त SUV मानले जाते.


  एक्सचेंज बोनस बेनिफिट

  1. दर तुम्ही 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी जूनी कार एक्सचेंज करता तर तुम्हाला 25 हजारांचा बोनस मिळेल.

  2. जर कार 7 वर्षांपेक्षा जास्त जूनी असेल तर त्यावर 15 हजारांचा बोनस मिळेल.

  24.3 KM/L चे मायलेज

  > मारुतीच्या या SUV मध्ये 1248 cc चे DDiS 200 इंजिन आहे. या गाडीची मॅक्सिमम पॉवर 66 kW @ 4000 rpm आणि मॅक्सिमम टॉर्क 200 Nm @ 1750 rpm आहे.

  > यात 48 लीटरचा फ्यूअल टँक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की ही गाडी 24.3 KM/L चे मायलेज देते.

  > या गाडाला AMT व्हेरिएंटमध्ये खरेदी केले जाऊ शकते, म्हणजेच याचे गिअर चेंज करण्याची गरज नाहीये.

  > कारला कंट्रोल करण्यासाठी यात ABS सोबतच EBD देखील दिले आहे. रिव्हर्स पार्किंग कॅमऱ्याचीही सुविधा यात दिली आहे.

  > यात 7 इंच डिस्प्ले असलेला स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टीम दिला आहे, जो ब्लूटूथनी कंनेक्ट करता येतो आणि नॅविगेशन सपोर्ट करतो.

  > यात ABS, डुअल एअरबॅग्स, हायस्पीड वॉर्निंग, रिव्हर्स पार्किंग सेंसर्स,अॅडवांस AC यासारखे फीचर आहेत.

  > ब्रेजाचे टॉप व्हेरिएंट डुअल-टोन कलरमध्ये मिळते, याती किंमत अंदाजे 10,55,189 रूपये आहे.

Trending