आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सर्वात स्वस्त 8 सीटर कार, किंमत फक्त 2.73 लाख रुपये...यामुळे कंपनी बंद करणार प्रॉडक्शन; 34 वर्षांपासून होती लोकांची पसंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुती सुझुकी आपल्या नावाजलेल्या आणि भारतातील 8 सीटर कार ओम्नीचे उत्पादन बंद करणार आहे. कंपनीने सांगितले की, 2020 पासून भारतात न्यू व्हेइकल सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम चालू होणार आहे. या कारणामुळे या कारची निर्मिती बंद करावी लागणार आहे. ही कार सेफ्टी नॉर्म्सनुसार नसल्यामुळे कंपनी हा निर्णय घेतला आहे.

 

मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, अशा अनेक गाड्या आहे ज्यांची निर्मिती ही सेफ्टी नॉर्म्सनुसार नाही. त्यामुळे आम्हाला या सर्व गाड्यांची निर्मिती थांबवावी लागणार आहे. या गाड्यांपैकी मारुती सुझुकी ओमनीसुद्धा आहे. ओम्नीचा पुढचा भाग पूर्णपणे चपटा असल्याने नव्या सेफ्टी नॉर्म्सच्या नियमात ही गाडी कुठेच बसत नाही.

 

1984 मध्ये ओम्नी कार झाली होती लॉन्च

मारुतीने ओम्नी कारला 34 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 1984 मध्ये लॉन्च केले होते. ज्यानंतर या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले, परंतू मॉडेलमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नव्हता. कंपनीने 1998 मध्ये आणि 2005 मध्ये 2 फेसलिफ्ट दिले होते, या कारच्या डॅशबोर्डमध्ये हा शेवटचा बदल होता. कारमध्ये मागिल दरवाजे हे स्लाइड करणारे दिले आहे.

 

मारुती ओम्नीचे फीचर्स

> या कारमध्ये 796cc चे तीन-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 35 bhp एवढी पॉवर आणि 59 Nm पीक टॉर्क जनरेट करतात.
> 2 स्पीड वायपर, 3 पोझिशन केबिन लाइट, मल्टी-फंक्शन लिव्हर दिलेले आहे.
> हाय माउंटेड रिअर स्टॉप लॅम्प आणि हेडलॅम्प लेव्हलिंग डिव्हाइस दिलेले आहेत.
> 4 मॅन्युअल फॉर्वर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर बॉक्स दिले आहे.
> ओम्नी 5 सीटरचे वजन 785kg आणि 8 सीटरचे वजन 800kg एवढे आहे.
> समोर डिस्क (बूस्टर असिस्ट) ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक दिले आहे.
> टायरची साइज 145R 12 LTR 8PR एवढी आहे.
> कारमध्ये 35 लीटर क्षमतेची पेट्रोलची टाकी दिली आहे. या कारचे मायलेज 16.8km/l आहे.
> दिल्लीच्या शोरुममध्ये या कारची 5 सीटर मॉडेलची किंमत 2.72 लाख रुपये तर 8 सिटर मॉडेलची किंमत 2.73 लाख आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...