आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती सुझुकीने 63 हजार कार माघारी बाेलावल्या, सुरक्षिततेसाठी कंपनीने घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियाने ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन जवळपास ६३ हजार कार माघारी बाेलावण्याचे जाहीर केले आहे. ज्या कार परत मागवल्या आहेत त्यामध्ये सियाजचे काही पेट्राेल स्मार्ट हायब्रीड माॅडेल, अर्टिगा आणि एक्सएल ६ वाहनांचा समावेश आहे. कंपनीने एक जानेवारी २०१९ ते २१ नाेव्हेंबर २०१९ या कालावधीत बनवलेल्या कार रिकाॅल केल्या आहेत. मारुती सुझुकीने जागतिक पातळीवर वाहने रिकाॅल केली आहेत. कंपनी या कारच्या माॅडेलमधील ६३,४९३ वाहनांच्या व्हेइकल जनरेशन युनिटमधील कमतरतेची तपासणी करेल. उत्पादनाच्या वेळी कारच्या एमजीयूमध्ये कमतरता आली आहे. यादरम्यान कंपनी असा काेणताही पार्ट माेफत बदलून देणार आहे. ग्राहकांकडून काेणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी ६ डिसेंबरपासून रिकाॅल प्रक्रिया सुरू करणार आहे.

काय करावे लागेल

ग्राहकांना मारुती सुझुकीच्या marutisuzuki.com (Important customer info tab) वेबसाइटवर जावे लागेल. तेथे १४ अंकी अल्फा न्युमेरिक वाहनांचा चेसिस नंबर नाेंद करावा लागेल. त्यावरून काेणत्या वाहनांना रिकाॅल केले अाहे ते कळू शकेल. येथे तुम्हाला तुमच्या वाहनाच्या बाबतीत माहिती मिळेल.
 

बातम्या आणखी आहेत...