आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवाळीला 5 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा कार, Maruti Suzuki Swift ची लिमिटेड एडिशन ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्सवांच्या काळात कार कंपन्यांमध्ये नवीन नवीन मॉडेल लाँच करण्याची आणि ऑफर्सची स्पर्धा असते. त्यामुळे  Maruti Suzuki Swift देखिल स्वस्तात खरेदी करण्याची ऑफर दिली जात आहे. लिमिटेड एडिशनवर ही ऑफर लागू असेल. कंपनी या फेस्टीव्ह सिझनसाठी एक्सक्लुसिव्ह LXi आणि LDi व्हेरीयंट घेऊन आली आहे. 4.99 लाखांत ही कार खरेदी करता येणार आहे. या खास एडिशनमध्ये अनेक नवे फिचर्स मिळणार आहेत. त्यासाठी कंपनीला अतिरिकत पैसेही द्यावे लागणार नाहीत. 


कारमध्ये नवीन काय 
नवे फिचर म्हणून Maruti Suzuki Swift च्या लिमिटेड एडिशनमध्ये दोन स्पिकरसह singe-DIN bluetooth stereo आणि ब्लॅक प्रिंटेड व्हील कव्हर असतील. त्याशिवाय फ्रंट पॉवर विंडो,  ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग आणि स्टैंडर्ड किटसह रियर पार्किंग सेंसर असेल. कंपनीने कारच्या अंजीन आणि इतर बाबींमध्ये बदल केलेला नाही. 


Maruti Suzuki Swift ची नवी कार 1.2 लीटर पेट्रोल मोटरमध्ये 82  bhp चे पॉवर देईल. दुसरीकडे 1.3 लीटर डिझेल व्हेरीएंटमध्ये 74 bhpचे पॉवर जेनरेट होईल. Swift ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...