• Home
  • Business
  • Auto
  • Maruti Suzuki to be build gypsy jeep for Indian Army after announcement to stop production

Auto / भारतीय लष्कराची ही मागणी पूर्ण करणार मारुती सुझुकी, संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला मिळाली नियमांत विशेष सूट

मारुती सुझुकीने 33 वर्षांनंतर मार्च 2019 मध्ये जिप्सीचे उत्पादन बंद करण्याची केली होती घोषणा
 

दिव्य मराठी वेब टीम

Jun 04,2019 06:01:09 PM IST

नवी दिल्ली - लष्कराची पहिली पसंती ही जिप्सी कारला आहे. पण मारुती सुझुकीने 33 वर्षांनंतर मार्च 2019 मध्ये जिप्सीचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती. नवीन सुरक्षा नियमामुळे या गाडीचे उत्पादन करणे कंपनीसाठी अवघड होते. भारतीय लष्कराने जिप्सीचा विशेष उपयोग पाहत मारुती सुझुकीकडे 3051 जिप्सी गाड्यांची मागणी केली आहे. अशातच संरक्षण मंत्रालयाने मारुती सुझुकीला नियमवलीत सुट देत लष्करासाठी जिप्सीचा मार्ग सोपा केला आहे.


यामुळे लष्कराची जिप्सीला पसंती
मारुती सुझुकी जिप्सीचे उत्पादन बंद होऊनही फक्त लष्करासाठी जिप्सीची निर्मिती करणार आहे. कारण लष्करासाठी जिप्सी खूप फायदेशीर आहे. कारण जिप्सी फक्त 985 किलोग्राम वजनाची आहे. याचे हार्ड टॉप व्हर्जनचे वजन 1020 किलोग्राम आहे. जिप्सीचे वजन कमी असल्यामुळे अरुंद आणि कठीण रस्त्यांवर चालविणे सोपे असते. सोबतच जिप्सीला कमी पावरच्या हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्टद्वारे सहजरित्या उंच ठिकाणी नेता येते. याशिवाय बर्फाळ आणि चिखलाच्या रस्त्यावर जिप्सीला चालवणे सोपे असते.

जिप्सीद्वारे हत्यारांची ने-आण करणे होते सोपे
आर्मी दूरच्या दुर्गम भागात दररोज हत्यारे आणि राशनची ने-आण करावी लागते. जिप्सी वजनाने हलकी असली तरी 500 किलोग्रामपर्यंत ओझे नेण्याची क्षमता आहे. आपल्या या खास वैशिष्ट्यामुळे जिप्सी भारतीय सेनेची पसंतीची गाडी आहे. मारुती जिप्सीत 16-वॉल्व MPFI G13BB पेट्रोल इंजिन आहे. ते 80 Bhpची पावर आणि 103 Nm टॉर्क जनरेट करते. लष्काराला कमी तापमानात काम करावे लागते. यामुळे अशा ठिकाणी डीझेलच्या तुलनेत पेट्रोल इंजिन फायदेशीर ठरते.

X
COMMENT