Home | Business | Auto | maruti Suzuki to launch updated version of ertiga MPV

स्विफ्टच्या किमतीत येतेय मारुतीची ही 7 सीटर कार, स्टाइलच्या बाबतीत Marrazo लाही देईल टक्कर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:00 AM IST

अर्टिगा ही 7 सीटर कार असून संपूर्ण कुटुंबासाठी ही कार आदर्श मानली जाते. कंपनी आता या कारचे अपडेट व्हर्जन लाँच करत आहे.

 • maruti Suzuki to launch updated version of ertiga MPV

  नवी दिल्ली - भारतात सध्या उपलब्ध असलेल्या MPV (मल्टी पर्पज व्हेइकल) चा विचार केला तर मारुती सुझुकी अर्टिगाला सर्वाधिक पसंती मिळते. अर्टिगा ही 7 सीटर कार असून संपूर्ण कुटुंबासाठी ही कार आदर्श मानली जाते. कंपनी आता या कारचे अपडेट व्हर्जन लाँच करत आहे, त्यात पूर्वीपेक्षा अधिक हायटेक फिचर्स दिले जातील.


  मारुती सुझुकी कंपनीच्या कारच्या विक्रीमध्ये अर्टिगाचे स्थान आघाडीवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी दर महिन्याला 4000 पेक्षा जास्त अर्टिगा कारची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. MPV असल्याने अनेक प्रकारच्या कामांमध्ये या गाडीचा वापर करता येतो. तसेच किंमत कमी असल्याने लोकांची या कारला अधिक पसंती मिळते. महिंद्राने नुकतीच शार्क माशाच्या थीमवर डिझाइन असलेली मराझो ही एमपीव्ही लाँच केली आहे. पण अर्टिगाचे हे नवे व्हर्जन असलेली कार या कारला टक्कर देणार अशी खात्री आहे.


  अर्टिगाची ही सेकंड जनरेशन कार ऑक्टोबरच्या अंतिम आठवड्यात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. त्यामागचे कारण म्हणजे ऑक्टोबरपासून सणा सुदीच्या सिझनला सुरुवात होत असते. या काळात लोकांचा कार खरेदीकडे अधिक ओढा असतो असे म्हटले जाते, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.


  फिचर्स आणि किंमत
  अर्टिगा सेकंड जनरेशनमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल इंजीन आहे त्यामुळे 100 बीएचपी एवढी पॉवर जनरेट होते. कारमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल आणि 4 स्पीड टॉर्क कनव्हर्टर अॅटोमॅटिक गीअरबॉक्स आहे. तुम्हाला हवे ते व्हर्जन खरेदी करता येईल. त्याशिवाय थ्री स्पोक मल्टीफंक्शन स्टेअरींग व्हील, टचसक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि अॅटोमॅटिकटक क्लायमेट कंट्रोल असे फिचर्स आहेत. या कारची किंमत 9 ते 10 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Trending