Home | Business | Auto | Maruti To Tata ; Best CNG Cars in India, Mileage Cost Rs. 1.2/km

या आहेत भारतातील मोस्ट माइलेज कार, किंमत फक्त 2.96 लाख रुपयांपासून सुरू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 05:35 PM IST

यात काही कार तर 1.13 रुपये प्रति किमी अशा सरासरीने मायलेज देतात.

 • Maruti To Tata ; Best CNG Cars in India, Mileage Cost Rs. 1.2/km

  ऑटो डेस्क - भारतीय मार्केटमध्ये आता CNG वर चालणाऱ्या कार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हुंदईने त्यांची ऑल न्यू सँट्रो सुद्धा CNG व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. तर, मारुतीने टाटापूर्वीच CNG कार बनवली. मारुतीच्या 5 कार CNG व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे खर्च कमी मायलेज जास्त...

  भारतात सगळ्यात स्वस्त CNG कार टाटा नॅनो आहे. दिल्लीत याची एक्स-शोरूम प्राइज 2.96 लाख रुपये आहे. या कारचे मायलेज 36km चे आहे. म्हणजेच 1km चा खर्च फक्त 1.13 रुपये आहे. दिल्लीत CNG ची कींमत 41 रुपये प्रति किलो आहे.

  दमदार मायलेजवाली कार

  > पेट्रोल व्हॅरिएंटच्या तुलनेत CNG कारच्या किंमतींमध्ये 50 ते 80 हजारचे अंतर आहे. तर डीझेल व्हॅरिएंटमधील अंतर 1 लाखाच्या आसपास आहे.

  > सध्या CNG मॉडेलच्या सर्वात जास्त गाड्या मारुती सुझुकी बनवते. यात Alto 800, Alto K10, Celerio, WagonR, Eeco आहेत.

  > CNG चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याने प्रदुषण होत नाही. पण यामुळे कारला पिकअप पण नाही मिळत.

  > CNG ची कींमत पेट्रोल आणि डीझेलच्या तुलनेत खुप कमी आहे.

  > CNG कार पेट्रोलवर पण चालते. म्हणजे CNG संपल्यानंतर पेट्रोल मोडवर पण चालवू शकता.

  CNG मॉडेल्सची एक्स-शोरूम कींमत आणि मायलेज

  1. Tata Nano EMax XM
  किंमत 2.96 लाख रुपये आणि मायलेज 36km
  1km चा खर्च फक्त 1.13 रुपये

  2. NEW ALTO 800 LXI CNG
  किंमत 3.71 लाख रुपये आणि मायलेज 33.44km
  1km चा खर्च फक्त 1.22 रुपये

  3. NEW ALTO K10 LXI CNG(O)
  किंमत 4.14 लाख रुपये आणि मायलेज 32.26km
  1km चा खर्च फक्त 1.27 रुपये

  4. CELERIO VXI CNG
  किंमत 5.14 लाख रुपये आणि मायलेज 31.76km
  1km चा खर्च फक्त 1.29 रुपये

  5. EECO MC 5 STR STD WITH CNG
  किंमत 4.01 लाख रुपये मायलेज 20km
  1km चा खर्च फक्त 2.05 रुपये

  6. WAGONR LXI CNG
  किंमत 4.68 लाख रुपये आणि मायलेज 26.6km
  1km चा खर्च फक्त 1.54 रुपये

  7. Santro Magna CNG
  किंमत 5.23 रुपये आणि मायलेज 30.48km
  1km चा खर्च फक्त 1.34 रुपये

Trending