आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पायडर मॅन, हल्क या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे स्टेन ली यांचे निधन, दीर्घकाळापासून होते आजारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडर मॅन व हल्क यांसारख्या अनेक सुपरहीरोंचे जन्मदाते स्टेन ली यांचे सोमवारी (12 नोव्हेंबर) लॉस एंजिलिस येथे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.  ली यांची कन्या जे. सी. ली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ली यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सीडर्स मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कॉमिक्स जगताचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 

 

स्टेन ली हे कॉमिक्स लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि प्रकाशक होते.  1961 मध्ये 'द फॅन्टास्टिक फोर' हे सुपरहीरो असलेले कुटुंब ली यांनी वाचकांच्या हाती दिले. त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ली यांनी अनेक सुपरहिरोंना आपल्या लेखणीतून जन्म दिला.

 

स्पायडर मॅन, हल्क, एक्स मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँट मॅन हे सुपरहिरो त्यांच्यामुळे अवघ्या जगाला मिळाले. पनिशर, डेअरडेव्हिल हे अँटी सुपरहिरोही ली यांनी उभे केले. हॉलिवूडने ली यांनी निर्माण केलेल्या पात्रांवर चित्रपट बनवले. या सर्व चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. 


2009 मध्ये डिज्नीने 4 बिलियन डॉलरमध्ये मार्वल एंटरटेन्मेंट खरेदी केले होते. मार्वल्सच्या सुपरहीरोजवर आधारित  'एवेंजर्स : इनफिनिटी वॉर' हा चित्रपट जगातील सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांपैकी एक आहे.  

बातम्या आणखी आहेत...