आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mary Kom Won 7 Medals In The World: The Host Of India Has Won Four Medals

7 पदके जिंकणारी मेरी काेम जगातील पहिली: यजमान भारताची चार पदके झाली निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  आॅलिम्पिक पदक विजेती  अाणि  पाच वेळच्या चॅम्पियन मेरी काेमने मंगळवारी एेतिहासिक विक्रमी पदकाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. तिने  आयबा जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. यासह तिने आपल्या ४५ ते ४८ किलो वजन गटात ही कामगिरी करत भारताचे पहिले पदक पक्के केले. तिचे हे करिअरमधील या स्पर्धेतील सातवे पदक ठरले. अशा प्रकारे या स्पर्धेत सात पदके जिंकणारी मेरी काेम ही जगातील पहिली बाॅक्सर ठरली अाहे.    


मेरी कोमने पाच वेळा जागतिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे. तिने २००२ अंताल्या, २००५ पोडोल्स्क, २००६ नवी दिल्ली, २००८ निंग्बो सिटी आणि २०१० मध्ये ब्रिजटाऊन येथे सोनेरी यश मिळवले. त्याचप्रमाणे २००१ मध्ये स्क्रांटन मधील आपल्या पहिल्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. या ऑलिम्पिक विजेता खेळाडूला २०१० नंतर आयबा स्पर्धेतील पहिल्या पदकाची अाशा आहे.   

 

या मणिपुरी बॉक्सरने यंदा सुवर्णपदक जिंकल्यास आयर्लंडच्या केटी टेलरच्या पाच जागतिक किताबाचा विक्रम मोडीत काढेल. ती आपल्या सहाव्या सुवर्णपासून केवळ दोन पावले दूर आहे. आता उपांत्य फेरीत मेरी कोम समोर उत्तर कोरियाच्या किम हयांग हिचे आव्हान असेल. हयांगने आपल्या क्वार्टर फायनल लढतीत कोरियाच्या बाक चोरोंगला हरवले.  
 भारताच्या भाग्यवती (८१ कि.), पिंकी राणी (५१ कि.), सिमा पुनियाला (८१ पेक्षा अधिक कि.) अापल्या गटात पराभवाचा सामना करावा लागला. 

 

मनीषाचा पराभव   
महिलांच्या ५४ किलो बॅटम वजन गटात भारताला पदकाची अाशा असलेल्या युवा खेळाडू मनीषाचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. या लढतीत मनीषाला स्टोइका पेत्रोवाने १-४ ने हरवले. पेत्रोवाने ३०-२७, २९-२८, २९-२८, २७-३०, ३०-२७ ने विजय मिळवला.

 

साेनिया, लवलिना अााणि सिमरनचेही पदक निश्चित
मेरीकाेमच्या  एेतिसहासिक यशापाठाेपाठ यजमान भारताच्या लवलिना, साेनिया अाणि सिमरनजीतने अापल्या वजन गटाच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. यासह त्यांनी यजमान भारताचे तीन पदकेही निश्चित केली. ही भारताची २००८ नंतरची सर्वाेत्तम कामगिरी ठरली. लवलीनाने ६९ किलाे वजन गटाच्या अंतिम अाठमध्ये अाॅस्ट्रेलियाच्या फ्रान्सिंसला ५-० ने मात केली. साेनियाने ५७ किलाे वजन गटात काेलंबियाच्या येनी काेस्टेनाडाला ४-१ ने पराभूत केले. 

 

मेरी काेमचा चीनच्या यूविरुद्ध जबरदस्त विजयी पंच
३५ वर्षीय महिला बॉक्सरने क्वार्टर फायनल लढतीत चीनच्या वू यू हिला ५-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. मेरी कोमने आपला सामना ३०-२७, २९-२८, ३०-२७, २९-२८, ३०-२७ ने जिंकला. मेरी कोमने विक्रमी सातवे जागतिक चॅम्पियनशिपमधील पदक निश्चित केलेे.

बातम्या आणखी आहेत...