आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mary Kom's Loss In Athletics Attitude After The Win; Refuses To Shake Hand With Nikhat

विजयानंतर मेरी काेमचा खिलाडूवृत्तीमध्ये पराभव; निखतसाेबतच्या हस्तांदाेलनास नकार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 51 किलाे वजन गटाच्या ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी मेरी काेम पात्र, निखतवर 9-1 ने मात
  • टाेकियाे ऑलिम्पिकसाठीची पहिली क्वालिफायर 3 ते 14 फेब्रुवारीत चीनमध्ये
  • इतर वजन गटात साक्षी, सिमरन, लवलिना आणि पूजा विजयी

​​​​​​नवी दिल्ली : सहा वेळची विश्वविजेती बाॅक्सर मेरी काेम आणि निखत जरीन यांच्यातील वादग्रस्त फाइट शनिवारी तमाम चाहत्यांच्या उपस्थितीत झाली. हीच अटीतटीची फाइट पाहण्यासाठी चाहत्यांची माेठ्या संख्येत उपस्थिती हाेती. यात ऑलिम्पियन मेरी काेमने बाजी मारली. तिने निखतला ९-० अशा फरकाने पराभूत केले. मात्र, या विजयानंतरही मेरी काेम खिलाडूवृत्तीमध्ये पराभूत झाली. पराभवानंतर निखत जरीनने मेरी काेमसाेबत हस्तांदाेलनासाठी हात पुढे केला. मात्र, अनुभवी आणि सीनियर बाॅक्सर मेरी काेमने हातात हात न देता रिंगमधून काढता पाय घेतला. यामुळे आक्रमक पवित्र्यामुळे अाता मेरी काेम पुन्हा एकदा चर्चेत सापडली आहे.

याच विजयाच्या बळावर आता मेरी काेमने पुढच्या वर्षी हाेणाऱ्या टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्वालिफायरमधील आपला प्रवेश निश्चित केला. ही पात्रता फेरी चीनमध्ये ३ ते १४ फेब्रुवारीदरम्यान हाेणार आहे.

गत वर्षभरापासून मेरी काेम आणि निखत यांच्यात एकमेकांवरच्या आराेपामुळे वादाचा सामना रंगला हाेता. अखेर याच वादावर आता शनिवारी झालेल्या फाइटने पडदा पडण्याची शक्यता हाेती. मात्र, आता मेरी काेमच्या गैरवर्तनाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

सन्मानासाठी आदर करण्याचे संस्कार असायला हवे : मेरी काेम

मी निखतसाेबत का म्हणून हस्तांदाेलन करावे? सन्मान हवा असेल तर दुसऱ्याचा आदर करण्याचा संस्कार असावा लागताे. यातूनच दुसऱ्याकडूनही सन्मान मिळताे. आदराने वागली असती तर मीदेखील तिला सन्मानच दिला असता'असे मेरी काेम म्हणाली.

मेरी काेम युवांसाठी आदर्श, तिचे अशाप्रकारचे वर्तन चुकीचे : निखत

सहा वेळची विश्वविजेती मेरी काेम ही देशभरातील युवा बाॅक्सरसाठी आदर्श खेळाडू आहे. तिला सर्वच युवा आपला आदर्श मानतात. अशात विजयानंतर हस्तांदाेलन करण्यास नकार देण्याचे हे गैरवर्तन सर्वांसाठीच धक्कादायक आहे,असे निखत म्हणाली.

जाेशातून हा सर्व प्रकार : अजय सिंग

वादग्रस्त फाइटदरम्यान अखिल भारतीय बाॅक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग उपस्थित हाेतेे. 'मेरी काेम ही आदर्श खेळाडू आहे. तिने स्वत:ची क्षमता आता चांगल्या प्रकारे सिद्ध केली आहे. मात्र, विजयानंतरच्या जाेशात केलेले वर्तन चुकीचे ठरते. जाेशात असे चुकीचे वर्तन कधी कधी हाेतेे. मात्र, आता त्याच्यावर चर्चा करणे चुकीचे ठरेल. याची चर्चा ही निरर्थक ठरेल. पुरुष गटात वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्यास संधी दिली जाते. मग हाच न्याय महिला गटातही देण्यात यावा. हा माझा वैयक्तिक मत आहे, असेही ते म्हणाले.

निखला पुन्हा एक संधी

निखत जरीनचे आता पराभवानंतर ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाचे स्वप्न भंगलेले नाही. तिला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी हाेण्याची एक संधी आहे. ज्या गटात ऑलिम्पिक काेटा मिळणार नाही, त्या गटासाठी पु्न्हा एकदा ट्रायलचे आयाेजन करण्यात येणार आहे. यामध्ये निखत जरीनला सहभागी हाेण्याची माेठी संधी आहे, अशी माहिती अखिल भारतीय बाॅक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी दिली. या दुसऱ्यांदा मिळणाऱ्या संधीला सार्थकी लावण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रीयाही निखतने यादरम्यान दिली.

बॉक्सिंग अग्रेसिव्ह खेळ आहे. मेरी काेम व निखत जरीन यांच्यातील आधीपासूनच वादाचा सामना हाेता. अशात रागाच्या भरात असे वर्तन घडलेले आहे. मात्र, निखतनेही याकडे दुर्लक्ष करावे. - कर्णम मल्लेश्वरी, ऑलिम्पियन

सीनियर खेळाडूंनी मैदानावर संयम बागळण्याची गरज आहे. यांच्या वर्तनाचा युवा खेळाडूंच्या मनावर वाईट परिणाम हेताे .मेरी काेमही सर्वांसाठी आदर्श बाॅक्सर आहे. तिने सर्व विचार करूनच वर्तन करावे. - देवाराजन, निवड समिती सदस्य.
 

बातम्या आणखी आहेत...