'मसान' फेम अभिनेत्रीने / 'मसान' फेम अभिनेत्रीने 'मेहंदी सर्कस'साठी घेतले सर्कसच्या कलाकारांकडून प्रशिक्षण 

Feb 07,2019 12:59:00 PM IST

बॉलिवूड डेस्क. वेब शो 'मिर्जापुर' आणि 'मसान' मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते रायटर राजू मुरुगनच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. 'मेहंदी सर्कस' टायटल असलेल्या या रोमान्सवर आधारित या चित्रपटातून ती पर्दापण करत आहे.


श्वे ता त्रिपाठी आपल्या आगामी 'मेहंदी सर्कस' चित्रपटात मेहंदी नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. ती सर्कसमध्ये काम करत असते. यासाठी नुकतेच श्वेताने खरोखर सर्कसमधील कलाकारांकडून प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या प्रशिक्षणाविषयी बोलताना श्वेता म्हणाली..., 'मी उत्साहित आहे, कारण हा माझा पहिला तमिळ चित्रपट आहे. वास्तविक सर्कस कलाकारांकडून प्रशिक्षण घेणे चांगले होते. सर्कसमध्ये काम करणे सोपे नसते हे नेहमी मी पुस्तकात वाचले आणि शोमधून पाहिले होते, पण त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या जीवनाविषयी कळले. स्टंट करताना त्यांच्यासाठी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसते. ज्या सुविधा आंतरराष्ट्रीय कलाकारांना मिळतात त्या आपल्याकडे नसतात,हे मला दिसून आले.

९०च्या दशकाच्या प्रेमकथेवर आधारित आहे चित्रपट
'मेहंदी सर्कस' ९०च्या दशकातील एक प्रेम कथा आहे. ही कथा सर्कस ट्रूप मधील एक मुलगी आणि कोडाइकनालच्या एका तरुणावर आधारित आहे. हा चित्रपट तामिळनाडूमधील ऱ्हास होणाऱ्या एका परंपरेवर आधारित आहे.


चाकू फेकणेदेखील शिकले
श्वेताने या चित्रपटात आपल्या पात्राच्या तयारीसाठी विविध राज्यांच्या मास्टर प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतले. तामिळनाडूच्या चिन्नमन्नूर आणि मदुराईच्या रिअल सर्कस ट्रूपमधून तिने प्रशिक्षण घेतले आणि तेथे चित्रपटासाठी शूटदेखील केले. त्या ट्रूपचे नाव राजा होते. ती सांगते..., "सर्कसमध्ये काम करतानाचे सर्व बारकावे मी शिकले आहे. चाकू फेकणेदेखील शिकले आहे. खरं तर, मी सर्व या चित्रपटात करणार नाही. मात्र आपल्याला सर्व क्षेत्रांचे ज्ञान असायला हवे, असे मला वाटते.

X