आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया : 65 फूट टॉवर जाळून दिला थंडीला निरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को  - हे छायाचित्र रशियातील कलुगा शहरातील आहे. शनिवारी येथे २३० वर्षे प्राचीन मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. या उत्सवात स्थानिक लोकांनी ६५ फूट उंच लाकडी टॉवर जाळून थंडीला निरोप दिला. यात सहभागी होण्यासाठी देशभरातून सुमारे ७ हजार लोक आले होते. हा उत्सव आपल्या देशातील होळीप्रमाणे असतो. टॉवरमध्ये पेटलेली आग थंडी नाहीशी होण्याचे प्रतीक मानली जाते. या उत्सवाची सुरुवात १७८९ मध्ये झाली होती. तेव्हा पेटत्या टॉवरला क्रांती मानले गेले होते. 


आता दरवर्षी हा उत्सव खूप उत्साहात साजरा होतो. लाकडी टॉवर उभारण्यासाठी दोन महिने आधी लोकांची तयारी सुरू होते. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी लोक विविध रंगांचे गणवेश घालून येतात. तेथे स्थानिक कार्यक्रमही होतात. या कार्यक्रमात लाेकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. येथील जनता या उत्सवाच्या प्रतीक्षेत असते. 


बेलारूस व युक्रेनमध्ये लाकडी पुतळे जाळतात
हा सण बेलारूस व युक्रेनमध्येही साजरा केला जातो, परंतु तेथे टॉवरऐवजी लाकडी पुतळे जाळतात. हे पुतळे पारंपरिक कार्यक्रमानंतर पेटवून दिले जातात. लाकडापासून तयार झालेले टॉवर व पुतळ्यासाठी झाडे तोडली जात नाहीत. उलट जंगलातील वाळलेली लाकडे वापरली जातात. पुतळे तयार करण्यासाठी स्थानिक कारागिरांना बोलावले जाते.

बातम्या आणखी आहेत...