Home | International | Other Country | Masood Azhar UNSC listing for global terrorist China hints it may block move

चीनने 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला वैश्विक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवले, अमेरिकेलाही चीनने झुगारले 

वृत्तसंस्था | Update - Mar 14, 2019, 09:08 AM IST

4 मुद्द्यांद्वारे समजून घ्या चीन मसूदला का वाचवतो

 • Masood Azhar UNSC listing for global terrorist China hints it may block move

  न्यूयॉर्क - पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेला जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला १० वर्षांत चौथ्यांदा पुन्हा एकदा चीनने वाचवले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरला. बुधवारी जर्मनीनेही असाच प्रस्ताव मांडला होता. मात्र, मसूदला दहशतवादी घोषित करण्यापूर्वी एक तास चीनने तांत्रिक कारण पुढे करत आडकाठी आणली. पुराव्याशिवाय कारवाईस आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले. तीन दिवसांपूर्वीही चीनने हीच भूमिका मांडली होती. यावर सद्सद््विवेकबुद्धीने निर्णय घ्या, असा सल्ला अमेरिकेने दिला होता. भारत-पाकदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी मसूदला दहशतवादी घोषित करणे आवश्यक अाहे, असेही अमेरिकेने सुनावले होते.


  बंदी अाली असती तरी...
  २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईदलाही संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केले होते. मात्र, आज तो पाकमध्ये असून जाहीरपणे सभा घेतो, नवे अतिरेकी घडवतो. मात्र, हाफिजची जमात-उद-दावा ही संघटना जगाच्या नजरेत येऊ नये म्हणून जाहीरपणे हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.


  ४ मुद्द्यांद्वारे समजून घ्या चीन मसूदला का वाचवतो
  १. पाकिस्तानात ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य पाकमध्ये चीनने सीपॅकमध्ये ५५ अब्ज डॉलरची (३.८ लाख कोटी रु.) गुंतवणूक करणार आहे. याशिवाय काही प्रकल्पांसाठी ४६ अब्ज डॉलर (३.२ लाख कोटी) खर्च केले आहेत. पाकमधील नोंदणीकृत विदेशी कंपन्यांपैकी सर्वाधिक ७७ चीनच्या आहेत.


  २. भारताला अंतर्गत प्रश्नांवरून कोंडीत पकडणे चीन भारताला आपला सर्वात मोठा आर्थिक प्रतिस्पर्धी मानतो. भारताने दक्षिण अाशियातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता, अंतर्गत प्रश्नांवर गुंतून राहावे अशी चीनची इच्छा आहे. चीन मसूदच्या विरोधात गेला असता तर भारताचे पारडे जड झाले असते.


  ३. मुस्लिमांवर कारवाईत पाक चीनच्या पाठीशी
  चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. ते उघडपणे नमाज पढू शकत नाहीत. इस्लामिक सहकार्य संघटनेच्या देशांत केवळ पाकच या निर्बंधांना योग्य मानतो. त्यामुळे या आघाडीवरही चीनला पाकची गरज आहे.


  ४. अमेरिका आणि दलाई लामा हेही कारण : भारत आणि अमेरिका यांचे सुमधुर संबंध चीनच्या विरोधात जातात. त्यामुळे चीनने मसूद अझहरचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. जसे मसूदबाबत भारताला वाटते, तसेच भारतात आश्रय घेतलेल्या दलाई लामांबाबत चीनला वाटते.


  २००९ मध्ये पहिला प्रस्ताव, नंतर ३ वेळा आला, चीनची दरवेळी आडकाठी
  चीनने २००९, २०१६ आणि २०१७ मध्येही मसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या विरोधात व्हेटोचा वापर केला आहे. मसूदच्या विरोधात सर्वात प्रथम भारतानेच २००९ मध्ये प्रस्ताव दिला होता.

Trending