आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणा अन् मूत्रपिंडाच्या आजाराने पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड त्रस्त, दीड वर्षापासून खाटेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ इस्लामाबाद- भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड व पाकिस्तानी अतिरेकी संघटना जैश-ए-मोहंमदचा म्हाेरक्या मसूद अजहर गेल्या दीड वर्षापासून अंथरुणाला खिळून आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अजहर गंभीर आजारी असून त्याला पाठीचा कणा व मूत्रपिंडाचा आजार आहे. यामध्ये त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी लष्करी रुग्णालयात त्याच्यावर उपचारही सुरू होते. डॉक्टरांनी त्याला आता पूर्ण विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. अहवालानुसार, ५० वर्षीय अजहरने आपल्या संघटनांची विभागणी दोन भाऊ रऊफ असगर व अतहर इब्राहिम यांच्यात केली आहे. हे दोघे भाऊ आता भारत व अफगाणिस्तानमध्ये हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानमधील एका मुत्सद्द्याने अजहरच्या आजारपणाला दुजोरा दिला नाही. मात्र, तो आपले गृहनगर बहावलपूर व पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नसल्याचे सांगितले. 


अजहरचा भाऊ रऊफ सध्या काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतोय
मसूद अजहरचा भाऊ रऊफ असगर सध्या भारत विशेषत: जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याच्या कामात गुंतला आहे. त्याचा दुसरा भाऊ अतहर बलुचिस्तान व अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी कारवाया करत आहे. विशेष म्हणजे, भारत व अमेरिका मसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहेत. 


१९९९ मध्ये कंदहार अपहरणानंतर मसूद अजहरची झाली सुटका 
सन १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर भारताने अतिरेकी मसूद अजहरची सुटका करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश करावा यासाठी भारत प्रयत्न करत आहे. मात्र, या मार्गात चीन अडथळा आणत आहे. २००१ मध्ये झालेल्या संसदेवरील हल्ला, २००५ मधील अयोध्या हल्ला व २०१६ च्या पठाणकोट एअरबेस हल्ल्याचा मास्टरमाइंड अजहरच होता,असे भारतीय अधिकारी मानतात. 

बातम्या आणखी आहेत...