आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाखराबाद येथील सामूहिक हत्याकांड; अाज सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - बाखराबाद येथील एका परिवारातील चाैघांच्या सामूहिक हत्याकांडात शिक्षेवर शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी हाेणार अाहे. याप्रकरणी न्यायालयाने १४ नाेव्हेंबर राेजी अाराेपी तिघा बापलेकांना दाेषी ठरवले हाेते. 

 

उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद येथे १४ एप्रिल २०१४ राेजी २ एकर शेत जमिनीच्या वादातून चार नातेवाइकांचे हत्याकांड घडले हाेते. विश्वनाथ माळी, वनमाला माळी, याेगेश माळी व राजेश माळी हे मृत्युमुखी पडले हाेते. याप्रकरणी त्यांचेच नातेवाईक असलेले आरोपी गजानन वासुदेव माळी व त्यांची दोन मुले नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी यांना अटक करून त्यांच्यावर कलम ३०२, ४५२, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. उरळ पोलिसांनी तपास करुन दाेषाराेप पत्र न्यायालयात सादर केले हाेते. 


शस्त्रांचा केला होता वापर 
हत्याकांडात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात अाला हाेता. घटनेच्या दिवशी राजेश घरीच थांबला आणि योगेश व चुलत बहीण वनमाला रोकडे हे पुन्हा शेतात गेले. त्यांच्याच पाठोपाठ आरोपी गजानन माळी व त्याचे दोन मुले नंदेश व दीपक हे कडबा कटरचे पाते व कुऱ्हाड घेऊन शेतात गेले हाेते. त्यानंतर योगेश माळी व वनमाला रोकडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

त्यानंतर तीनही आरोपींना विश्वनाथ माळी यांच्या घरी जाऊन योगेशचा भाऊ राजेश माळीवर हल्ला केला. त्यानंतर समोरून येत असलेल्या विश्वनाथ माळी यांच्यावरही हल्ला चढविण्यात आला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. 


शेतीच्या व्यवहारातून घडले होते हत्याकांड 
राजेश व योगेशचे वडील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन माळी याच्याशी दोन एकर शेती खरेदीचा व्यवहार केला होता. मात्र गजाननने इसार करण्यास नकार दिला. त्यामुळे भगवंतरावांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला हाेता. त्यामुळे घटनेच्या आठ दिवसांपूर्वी भगवंतरावांना शेतीचा ताबा मिळाला. नंतर पोलिसांत धमकी देण्याबाबत पोलिसांत तक्रारही झाली हाेती. या घडामोडीनंतर हत्याकांड घडल्याची चर्चा हाेती.

बातम्या आणखी आहेत...