आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 'वाल्मी'त आज महावृक्षारोपण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद | भूमी आणि जलव्यवस्थापन संस्था अर्थात, 'वाल्मी'च्या परिसरात 'दिव्य मराठी'च्या 'एक वृक्ष एक जीवन' या अभियानांतर्गत आज (३१ आॅगस्ट) मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दिव्य मराठी आणि वाल्मीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संघटना, महाविद्यालये, पर्यावरणप्रेमी नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत.  सकाळी साडेनऊ वाजता वाल्मीच्या परिसरातील मोकळ्या जागेवर हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, संस्थाचालक यांनीही या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही वृक्षारोपणात सहभागी होऊन आपले सामाजिक दायित्व निभवावे, असे आवाहन जलसंधारण आयुक्त दीपक सिंघल यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...