आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पावसाचा हाहाकार! अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुसळधार पावसाने बुधवारी रात्री पुण्यात अक्षरशः हाहाकार उडाला. अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या ओढ्यांना पूर आला. तर, कात्रज तलावही "ओव्हर फ्लो' झाला. आंबिल ओढ्याच्या दोन ठिकाणी भिंती ढासळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ओढ्याच्या पूराचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये वेगाने शिरले. परिणामी, सहकारनगरमधील संजिवनी सोसायटी, गणेश सोसायटी, तर असाच प्रकार कोल्हावाडी येथील लेन नंबर एकमधून जाणाऱ्या ओढ्याची भिंत कोसळली. 

कात्रज येथे पुलाखाली उभ्या केलेल्या 50 हुन अधिक 4 आणि 2 व्हिलर वाहुन गेल्या. कात्रज तलाव ओसांडून वाहल्याने पाण्याच्या लोंढ्यात दोन जण वाहून गेल्याची भीती महापालिकेच्या आपत्कालिन विभागातर्फे काही नागरिकांनी व्यक्त केली. आंबिल ओढ्याची भिंत फुटल्यामुळे सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या मागील गुरुराज सोसायटीसह अनेक सोसायट्यांमध्ये बुधवारी रात्री पाणी शिरले. 

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
बुधवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज गुरुवारी दि. 26 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार बारामतीत दाखल 
बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला पूर आला आहे. यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. दरम्यान एनडीआरफच्या 2 तुकड्या येथे दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या पथकांनी आतापर्यंत 15 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बारामतीचे आमदार अजित पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथे दाखल झाले आहे. नागरीकांना आवाहन
पुरंदर तालुक्यात ढगफुटी सारखा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असुन बारामती तालुक्यातील कर्ऱ्हा नदीला पूर आला आहे. तरी नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. कर्ऱ्हा नदीत 60 ते 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे. तरी नदीकाठच्या नागरीकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
     

पुणे शहरातील मृतांची नावे 
लक्ष्मीबाई शंकर पवार, श्रीतेज जगन्नाथ सदावर, जान्वी जगन्नाथ सदावर, रोहित भरत आमले, संतोष सहदेव कदम, अमृता आनंद सदामे, किशोर दत्तात्रय गिरमे, मच्छिंद्र पाडुंरंग बहुले, वंदना विकास अतीटकर, जोशना संजय राणे, नागराज बाळकृष्ण मिल, सुमन आदीनाथ शिंदे, बेपत्ता व्यक्तींची नावे
निकीता संजय भुट्टे, मुकेश हरिदास गाडीवर, संजय किसनराव दहिवाल, निखील दिनेश चव्हाण, सुरज संदिप वाडकर, गणेश तुकाराम शिंदे