आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्तानीने गिळला होता हिरा, चोरट्यांनी खोदली होती मस्तानीची सहा फूट खोल कबर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- थोरले बाजीराव पेशवे यांची आज (18 ऑगस्ट) जयंती. मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स.1720 पासून ते तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

 

बाजीरावाचे मस्तानीवर नि‍स्सिम प्रेम होते. दोघांच्या आयुष्यावर आधारित 'बाजीराव-मस्‍तानी' हा हिंदी चित्रपट आला होता.

 

बाजीराव यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आपल्यासाठी एक रोचक फॅक्ट्‍स घेऊन आलो आहोत.
1740 मध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पुण्याजवळ पाबळ येथे तिला दफन करण्यात आले. तो हिरा मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने आधी 1997 व त्यानंतर 2009 मध्ये अज्ञात चोरट्यांनी मस्तानीची कबरीचे खोदकाम केले. साधारण 6 फूट खोल कबर खोदून चोरट्यांनी हा प्रकार केला. त्यांच्या हाती काही लागले नाही, पण कबरीची मोडतोड झाली.

 

पुढील स्लाइडवर वाचा... बाजीराव- मस्तानीच्या मृत्यूचे खरे कारण...

 

बातम्या आणखी आहेत...