सायनासारखे बॅडमिंटन खेळण्यासाठी मागील 4 महिन्यांपासून सलग ट्रेनिंग घेत आहे परिणीती
दिव्य मराठी वेब टीम
Dec 02,2019 02:29:47 PM ISTबॉलिवूड डेस्क : परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी मानेला झालेल्या जखमेमुळे ग्रस्त होती. ज्यामुळे ती बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहिली. मात्र सोमवारपासून तिने पुन्हा शटल कॉक आणि रॅकेट हातात घेतले. सायना नेहवालच्या बायोपिकसाठी तयारी करत असलेल्या परिणितीने इंस्टाग्राम स्टोरीवर मॅचच्या डे वनची झलक शेअर केली आहे. सायना नेहवालवर बनत असलेल्या बायोपिकमध्ये आधी श्रद्धा कपूर काम करणार होती. पण डेट्सच्या कमतरतेमुळे तिने हा चित्रपट सोडून दिला.
4 महिने घेतले ट्रेनिंग...
परिणीती, सायनासारखे बॅडमिंटन खेळण्यासाठी मागील 4 महिन्यांपासून सलग ट्रेनिंग घेत आहे. ती बायोपिकसाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी 15 दिवस पनवेलच्या रामसेठ ठाकुर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये राहिली. जेणेकरून शूटिंग आणि बॅडमिंटनची प्रॅक्टिस एकाचवेळी करू शकेल. चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहे.
फॅन्स करत आहेत कौतुक...
परिणीतीचे फोटो पाहून तिचे आणि सायना नेहवालचे फॅन्स खूप खुश आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे. लोक सायना आणि परिणीतीचा लूक आणि बॉडी लँग्वेजची तुलना करत आहेत.
हे आहेत अपकमिंग प्रोजेक्ट्स...
या चित्रपटाव्यतिरिक्त परिणितीचा आगामी चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' आहे. जो पुढच्यावर्षी 8 मेला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल लंडनमध्ये झाले आहे. चित्रपटात परिणितीव्यतिरिक्त कीर्ती कुल्हारी, अदिती राव हैदरी, अविनाश तिवारीदेखील असतील.