आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रोम- इटलीतील शहर मातेरा. गरिबी व मागासलेपणामुळे या शहरात राष्ट्रीय कलंक समजले जात असे. परंतु येथील गुहांत झालेले चर्च, महाल व विकासाची कामे पाहता मातेरा शहरास २०१९ साठी युरोपच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे. आता येथे येणाऱ्या पर्यटकांना फक्त २२ डॉलरमध्ये (१५३८ रुपये) एक वर्षासाठी अस्थायी नागरिक होता येते. त्यांना दक्षिण रोममधील चारशे किमी परिघात संपूर्ण वर्षभर कोणत्याही शहरातून फिरता येईल.
मातेराचे महापौर राफेलो द रुगिरएरी यांनी म्हटले, वर्षभर मातेरा शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यात हजारो पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. मातेरा -बॅसिलिकाता २०१९ फाउंडेशनचे संचालक पाओलो व्हेरी यांनी सांगितले, लोकांनी येथे जरूर यावे आणि येथील नवा अनुभव घ्यावा. महापौर राफेलो द रुगिएरी यांनी म्हटले, मातेरा हे आगळेवेगळे शहर आहे. येथे विमानतळ, हायस्पीड स्टेशन अथवा मोटार-वे नाही. परंतु अधिकारी वर्गास या ठिकाणी यावेसे वाटेल. त्यायोगे त्यांच्यातील कलांचे प्रदर्शन ते येथे करू शकतील. मातेरा सांस्कृतिक राजधानी झाल्याने येथील विकासाला चालना मिळेल, असे मत फ्रान्सच्या अॅरियान बेयो यांनी व्यक्त केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.