आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात माजी मठाधीपतीने केला विद्यमान मठाधिपतींचा खून, आरोपी घटनास्थळावरूनच अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश भंडारकवठेकर

पंढरपूर - मठाधिपतींच्या नियुक्तीच्या वादातून एका माजी मठाधिपतीने विद्यमान मठाधिपतीचा चाकुने वार करून खून केला. मारुतीबुवा कराडकर मठात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. यात विद्यमान मठाधितपी जयवंत महाराज पिसाळ  (32, लवनमाची ता.वाळवा) यांचा मृत्यू झाला. तर बाजीराव बुवा कराडकर (वय 35) या माजीमठाधिपतीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील झेंडे गल्लीत मारूती बुवा कराडकर यांचा सुप्रसिद्ध असा जुना मोठा मठ आहे. या मठाची गुरू-शिष्य अशी परंपरा आहे. या परंपरेनुसार मारूती बुवांच्या निधनानंतर बाजीरावबुवां कराडकरांची गादीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र मठाच्या इतर विश्वस्तांना बाजीराव बुवांची नियुक्ती मान्य नव्हती असे सांगितले जात आहे. पुढे बाजीराव बुवांना मठाधिपती पदावरून हटवून जयवंत बुवा पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेथूनच वादाला तोंड फुटले. याच वादामध्ये जयवंत बुवा व बाजीराव बुवा यांच्यात नेहमीच खटके उडायचे.

दरम्यान 6 जानेवारीला पुत्रदा एकादशी असल्याने मठातील कीर्तन करण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. तर मंगळवारी दुपारी अडीच वाजता बाजीराव बुवांनी दोन हातात दोन चाकू घेऊन जयवंत बुवा राहत असलेल्या मठातील खोलीकडे आपला मोर्चा वळवला आणि काही समजण्याच्या आतच त्यांनी जयवंतबुवांवर चाकूने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी बाजीराव बुवा कराडकरला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...