आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाला आव्हान देणाऱ्या वशिष्ठ यांना तेव्हा बर्कले विद्यापीठाने अलौकिक बुद्धिमत्तेचा अभ्यासक संबोधले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - आर्यभट्ट आणि रामानुजम यांच्या परंपरेतील एक तारा गुरुवारी निखळला. प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायणसिंह (७३) यांचे पाटणा येथे निधन झाले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. प्रत्येक परीक्षेत अव्वल स्थान पटकावणारे वशिष्ठ यांना बर्कले विद्यापीठाने (कॅलिफोर्निया) अलौकिक बुद्धिमत्तेचा अभ्यासक असे संबोधले होते. वशिष्ठ यांनी आइनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतालाच आव्हान दिले हाेते. त्यांचा एक किस्सा अत्यंत प्रसिद्ध आहे... नासाच्या अपोलो यानाच्या प्रक्षेपणापूर्वी ३१ संगणक काही वेळ बंद पडले होते. जेव्हा हे संगणक सुरू झाले तेव्हा वशिष्ठ यांचे गणित आणि संगणकाचे कॅल्क्युलेशन अगदी सारखे होते. १९७३ मध्ये त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते. अनेकदा ते हॉटेलबाहेर उष्टे अन्न खातानाही सापडले होते... अखेर या महान गणितज्ञाने निरोप घेतला.श्रद्धांजली सर्वांनीच वाहिली, परंतु रुग्णवाहिकेसाठी दीड तास पार्थिव पडून


४० वर्षांपासून सिजोफ्रेनिया नामक आजाराने ग्रस्त वशिष्ठ नारायणसिंह पाटण्यात एका इमारतीत अज्ञात जीवन जगत होते. पुस्तके, वही आणि पेन्सिल हेच त्यांचे मित्र होते. पाटण्यात त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे भाऊ अयोध्यासिंहने सांगितले, अमेरिकेहून वशिष्ठ यांनी १० बॉक्स भरून पुस्तके आणली होती. ते नेहमी अभ्यासात व्यग्र असत. लहान मुलांसारखे त्यांना तीन-चार दिवसाला वही-पेन्सिल आणून द्यावी लागत असे. १९६४ मध्ये पाटणा विद्यापीठाने नियम बदलून त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला आणि बीएस्सी उपाधी दिली. हतप्रभ सायन्स कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. नागेंद्र नाथ यांनी तेव्हा कॉलेजमध्ये आलेले प्रो. केली (बर्कले विद्यापीठ) यांची वशिष्ठ यांची ओळख करून दिली. यानंतर वशिष्ठ कॅलिफोर्नियाला रवाना झाले. ८ सप्टेंबर १९६५ रोजी त्यांनी बर्कले विद्यापीठात प्रवेश घेतला. १९६६ मध्ये ते नासामध्ये कार्यरत होते. १९६७ मध्ये ते कोलंबिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्सचे संचालक झाले. १९६९ मध्ये त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला. हा प्रबंध प्रचंड चर्चेत राहिला. १९७१ मध्ये ते भारतात आले आणि आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम सुरू केले. ८ जुलै १९७३ रोजी त्यांचा विवाह झाला, परंतु तो टिकला नाही. त्यांचे मानसिक संतुलन ढासळले. संशोधनाची चाेरी, पत्नीशी तणावाचे संबंध, भावकीतील तणाव आणि भारतीय कार्य-संस्कृती याच्याशी ते जुळवून घेऊ शकले नाहीत. यातून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले. जानेवारी १९७४ मध्ये त्यांना वेडे ठरवून रांचीमध्ये संस्थेत दाखल करण्यात आले. १९७८ मध्ये सरकारने त्यांच्यावर उपचार सुरू केले. जून १९८० मध्ये बिहार सरकारने या उपचारांसाठी देण्यात येणारा निधी बंद केला आणि त्यानंतर ते अज्ञातवासात गेले. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली. परंतु त्यांचे पार्थिक नेण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. वाट पाहत पार्थिव दीड तास रुग्णालयाबाहेर पडून होते. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रुग्णवाहिका पाठवली.बातम्या आणखी आहेत...