आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइन्स्टाइनच्या सिद्धांताला आव्हान देणारे गणितज्ञ वशिष्ठ नारायण यांचे निधन   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी पाटणाच्या पीएमसीएच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. वशिष्ठ दीर्घकाळापासून सिजोफ्रेनिया आजाराने ग्रस्त होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालावली. वशिष्ठ नारायण यांनी शास्त्रज्ञ आइन्स्टाइनच्या सापेक्षताच्या सिद्धांताला आव्हान दिले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्यात आली नव्हती. यामुळे वशिष्ठ नारायण सिंह यांचा पार्थिव देह तब्बल दीड तास रुग्णालय परिसरात स्ट्रेचरवर ठेवला होता. वशिष्ठ नारायण यांचे मोठे बंधून बराच वेळ रुग्णालयाबाहेर उभे राहिले. रुग्णवाहिका चालकाने नारायण यांचे पार्थिव भोजपुरला नेण्यासाठी 5 हजार रुपये मागितल्याचे त्यांनी सांगतिले. काही वेळाने जिल्हाधिकारी कुमार रवी आणि काही नेते मंडळी रुग्णालयात दाखल झाली. यानंतर नारायण यांच्या पार्थिवाला रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी भोजपुरला नेण्यात आले. 

शिक्षकांना देखील शिकवताना अडवायचे वशिष्ठ नारायण


वशिष्ठ नारायण शालेय जीवनात अतंत्य कुशाग्र होते. पाटणा विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वशिष्ठ यांनी चुकीचे शिकवल्यानंतर गणिताच्या प्राध्यापकांना मध्ये अडवत होते. यामुळे प्राचार्यांनी त्यांना बोलावले आणि त्यांची परीक्षा घेतली. या परीक्षेत ते खरे ठरले. विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कॅलिफॉर्नियाच्या विद्यापीठातील प्राध्यापक जे कॅली यांनी त्यांची कुशाग्रता ओळखली आणि त्यांना अमेरिकेत घेऊन गेले. 

नासात केले आहे काम 


वशिष्ठ नारायण यांनी कॅलिफॉर्निया विद्यापीठातून पीएचडी घेतली आणि वॉशिंग्टन विद्यापीठात सहायक प्राध्यापक झाले. त्यांनी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये देखील काम केल आहे. भारतात परतल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई आयएसआय कोलकातमध्ये नोकरी केली. 

बातम्या आणखी आहेत...