आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ- ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बैठक आज(रविवार) लखनऊच्या मुमताज डिग्री कॉलेजमध्ये तीन तास चालली. यात एएमआयएएम अध्यक्ष असदुद्दीन औवेसीसहित देशभरातील मुस्लिम नेते पोहचले होते. या दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर बाहेर आलेले जमीयत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी म्हणाले की, ''आम्हाला माहिती आहे आमची याचिका 100% रद्द होईल. तरीदेखील आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करणार. हा आमचा अधिकार आहे.''
बैठकीत मस्जिदसाठी पाच एखर जमिन घ्यायची का नाही, यावरही चर्चा झाली. तर, सुन्नी वक्फ बोर्ड आणि आयोध्या प्रकरणातील पक्षकार इकबाल अंसारीने बैठकीचा बहिष्कार केला. शनिवारी लखनऊच्या नदवा कॉलेजमध्ये मुस्लिम पक्षकारांची बैठक झाली. ही बैठक बोर्डाचे महासचिव मौलाना वली रहमानीने बोलवली होती. मुस्लिम पक्षाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, प्रकरणात मोहम्मद उमर आणि मौलाना महफूजुर्रहमान यांच्यासोबत पक्षकार हाजी महबूब, हाजी असद आणि हसबुल्ला उर्फ बादशाह यांनी मौलाना रहमानी यांच्या भेटीदरम्यान सांगितले की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय विचारापलिकडचा आहे. याच्याविरुद्ध याचिका दाखल केलीच पाहीजे.
पुनर्विचार याचिका दाखल नाही करणार- सुन्नी वक्फ बोर्ड
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुन्नी वक्फ बोर्डाने स्पष्ट केलं आहे की, ते याविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार नाहीत. याबाबत सुन्नी वक्फ बोर्डाचे चेअरमॅन जुफर फारूकी यांनी पत्रकार परिषदही घेतली.
प्रकरणाला आणखी वाढवू नका- इकबाल अंसारी
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीवर इकबाल अंसारी म्हणाले की, आम्ही हिंदुस्तानातील मुसलमान आहोत आणि हिंदुस्तान चा संविधानही माणतो. अयोध्या खटल्यात हिंदुस्तानचा महत्वाचा निर्णय होता, आता आम्ही याप्रकरणाला पुढे वाढवणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.