Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | maun sodu chala bolu campaign for girls

किशोरवयीन मुलींची समूहगर्जना, हे शरीर माझं आहे, त्यावर माझाच अधिकार

मंजिरी काळवीट | Update - Mar 04, 2019, 08:46 AM IST

विद्यार्थिनींचा हुंकार, अन्याय सहन करणार नाही अाणि कुणी केला तर त्याला साेडणार नाही

 • maun sodu chala bolu campaign for girls

  औरंगाबाद - हे शरीर माझं आहे. यावर फक्त माझा अधिकार आहे. त्याकडे कुणी वाईट नजरेने पाहिलं, मला न विचारता स्पर्श केला तर मी त्याला धडा शिकवीन. टवाळखोरांना चपलेने मारीन, अशी समूहगर्जना औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील ४५० किशोरवयीन मुलींनी शुक्रवारी(दि. १) एकजुटीने केली. निमित्त हाेते 'दैनिक दिव्य मराठी' आणि जळगाव येथील अस्मिता फाउंडेशन यांच्या वतीने अाैरंगाबाद जिल्ह्यातील साेयगाव तालुक्यात आयोजित 'मौन सोडू, चला बोलू' या संवाद सत्राचे.

  लघुपटाने शिकवले गुड टच, बॅड टच
  याप्रसंगी रेणुका कड यांनी मुलींना 'काेमल' हा लघुपट दाखवला. या माध्यमातून गुड टच, बॅड टच कशाला म्हणतात, अापल्याला जर कुणी त्रास देत असेल तर अशा प्रसंगी कुणाशी संपर्क साधावा, अशी सविस्तर माहिती दिली. लघुपटानंतर कड यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.


  लघुनाटिकेतून स्वत्वाची अाेळख
  'मै अाैरत हूं' ही लघुनाटिका याप्रसंगी मंजुल भारद्वाज यांच्या टीमने सादर केली. केवळ महिला म्हणून त्यांच्यावर हाेणारे अन्याय व त्या ते कशा सहन करतात हे यातून स्पष्ट करण्यात अाले. महिला म्हणून स्वत:ला कमी लेखू नका, असा संदेश यातून देण्यात अाला.

Trending