आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौंढाळा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाड- येथून जवळच असलेल्या मौंढाळा येथील एका ५३ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
या वर्षी दुष्काळीस्थिती, खरीप हंगाम हातचा गेला. त्यातून पेरणी खर्ची हाती आला नाही. अशा स्थितीत दैनंदिन घरखर्च, डोक्यावर वाढते कर्ज अशा विवंचनेत मौंढाळा येथील शेतकरी जनार्दन भिका खरात वय ५३ यांनी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या नावावर २.५० एकर, तर त्यांचे पत्नीचे नावावर ५ एकर अशी ७.५० एकर शेती आहे. त्यांच्यावर महिंद्रा फायनान्स १ लाख रुपये, अदिती अर्बन को ऑप सोसायटीचे ५० हजार रुपये, आयसीआयसीआय बँकेचे २.५० लाख रुपये व बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपये असे एकूण ५ लाख रुपये मुद्दल कर्ज आहे. थकलेले कर्ज, सततची नापिकी यातून ते आर्थिक गर्तेत सापडले होते. अशातच ३० नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान, शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणाची चौकशी करून या कुटुंबास योग्य तो न्याय देण्यात येईल, असे तहसीलदार बगळे यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...