आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mauney Roy Is Now Out From The Movie 'Bole Chudia', Makers Said, 'she Is Irresponsible'

चित्रपट 'बोले चुडिया' मधून बाहेर झाली मौनी रॉय, मेकर्सने केले बेजबाबदार असल्याचे आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मौनी रॉय आता नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'बोले चूडिया'चा भाग असणार नाही. शुक्रवारी अभिनेत्री आणि फिल्म मेकर्सने एकमेकांवर आरोप करत याची अनाउंसमेंट केली. 2018 मध्ये अक्षय कुमारच्या अपोजिट चित्रपट 'गोल्ड'ने बॉलिवूड डेब्यू केलेल्या मौनीने यावर्षी मार्चमध्ये नवाजच्या अपोजिट 'बोले चुडिया' हा चित्रपट साइन केला होता. मात्र तिच्या प्रवक्त्याने म्हणणे आहे की, तिने कॉन्ट्रॅक्ट साइन केले नव्हते. एकीकडे जिथे मौनीने प्रोड्यूसरवर चुकीची वागणूक केल्याचा आरोप केला आहे तर प्रोड्यूसरने तिला बेजबाबदार म्हणले आहे.   

 

'बोले चुडिया' च्या प्रोड्यूसरचे आरोप... 
प्रोड्यूसर राजेश भाटियाने मौनीला बेजबाबदार ठरवत सांगितले, "आम्ही हे मान्यच करत नाही की, आमच्यापैकी कुणीही मौनीसोबत चुकीचे वर्तन केले आहे. कॉन्फरन्स रूममध्ये त्यावेळी 25 लोक आधीच होते. जेव्हा मौनी रॉय स्क्रिप्ट रीडिंगसाठी ठरलेल्या वेळेपेक्षा 3 तास उशिरा पोहोचली होती. आम्ही चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. अशात पूर्ण विनम्रतेने एखाद्याला प्रोफेशनल आणि रोलच्या प्रति ईमानदार राहण्यासाठी सांगणे चुकीचे आहे तर माफ करा आम्ही गंभीरतेने हक चित्रपट बनवत आहोत, हौस आहे म्हणून नाही." 

 

भाटिया म्हणाले - आम्ही नव्या हीरोइनसोबत शूट करू... 
राजेश भाटियाने पुढे सांगितले, "अभिनेते, दिग्दर्शक, मी आणि किरण भाटियाने कन्टेन्ट हेड आणि प्रोड्यूसर असल्यानात्याने मौनीला बेजबाबदार वर्तनामुळे खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने एकदम स्वतःवरचा ताबा सोडून असे काही वर्तन केले की, तेथे उपस्थित असलेले सर्वच वरिष्ठ लोक हैरान झाले. आम्ही तिला त्याचवेळी रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला. 'बोले चुडिया' चे शूटिंग ठरलेल्या वेळीच पूर्ण होईल, पण आता आम्ही नव्या हीरोइनसोबत शूट करणार आहोत. प्रोडक्शन हाउस असल्यामुळे वुडपेकर फिल्म पूर्वीप्रमाणे आमच्यासोबत सलंग्न राहील."

 

प्रोड्यूसरने सांगितले, 'चित्रपटात कसा आहे मुलीचा रोल...'
राजेश म्हणतो, "जेव्हापासून आम्ही मौनीला चित्रपटासाठी साइन केले आहें , तेव्हापासून स्वतः मौनी आणि तिची एजन्सी तोआभचे वागणे खूपच अव्यावहारिक आणि बेजबाबदार राहिले आहे. तरीही आम्ही तिला पेमेंट आधीच दिले होते. 29 मेला झालेल्या स्क्रिप्टच्या फायनल नरेशनच्या दिवशीही मौनी 3 वाजेऐवजी संध्याकाळी 5.30 वाजता आली. तिच्या वागण्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता खूप निराश झाले. ही एक अतिशय चांगली स्क्रिप्ट आहे आणि जिथे रचनात्मकतेची गोष्ट आहे तर ते डायरेक्टरकडे आहे. पण चित्रपटात मुलीचा रोल खूप महत्वाचा आहे. यामध्ये 5 गाणी मुलीवर चित्रित करायची आहेत. अशात मग इतक्या चांगल्या रोलबद्दल तक्रार करणे चुकीचे आहे. तिने तर इतर चित्रपटांमध्ये खूपच छोटे आणि साधे रोल केले आहेत."

 

अभिनेत्रीच्या प्रवक्त्याने आरोप झिडकारले... 
मौनी रॉयच्या प्रवक्त्याने प्रोड्यूसरच्या आरोपांना झिडकारत तिने काही गोष्टी जुळत नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टदेखील साइन केले नव्हते असे सांगितले. प्रवक्ता म्हणाला, "मौनी आता चित्रपटाचा भाग नाहीये. तिने याअगोदर अनेक चित्रपट केले आहेत आणि तिचे करियर खूप सक्सेसफुल आहे, जिथे सर्वच जणांना तिचे व्यावहारिक वागणे आवडते. राजेश भाटिया दुसरा चित्रपट बनवत आहेत, पहिली नाही. चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' आधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी एका सीनियर अभिनेत्यावर इंटरफेअर केल्याचा आरोप केला आहे. आता ते म्हणत आहेत की, मौनी प्रोफेशनल नाही. मात्र अनेक मेल्स आणि मॅसेजेस काही वेगळेच सांगत आहेत. आम्ही आनंदाने ते शेअर करू शकतो. काही गोष्टी जुळत नसल्याने कॉन्ट्रॅक्टदेखील साइन केले गेले नव्हते." प्रवक्ताचे म्हणणे आहे की, मौनीने या प्रकरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

आधीही वादांमध्ये अडकली होती मौनी... 
मौनीचा इतिहास वादविवादांनी भरलेला आहे. अशातच जेट एअरवेजच्या फ्लाइटमध्ये यात्रेदरम्यान मौनीने एअरलाइंसच्या स्टाफवर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही मौनीने आकाश अंबानीच्या लग्नामधेही एका परफॉर्मन्समुळे खूप गोंधळ केला होता. 

बातम्या आणखी आहेत...