आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितरांची तिथी आहे अमावस्या : या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे? 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रांथानुसार पौष मासातील अमावास्येला मौनी अमावस्या म्हणतात. यावेळी ही अमावास्या 4 फेब्रुवारी, सॉसमवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजूंना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या दानाने पुण्य वाढते. येथे जाणून घ्या, मौनी अमावास्येला कोणत्या गोष्टींचे दान करावे...


1. गरम कपडे
पौष मासामध्ये थंडी राहते यामुळे या काळात गरजू लोकांना गरम वस्त्र उदा. चादर, घोंगडी दान करावी.


2. खाण्याचे गरम पदार्थ
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला गरमी देणाऱ्या पदार्थांचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. उदा. गूळ, तीळ, खिचडी.


3. काळे तीळ 
अमावास्येला पितरांची तिथी मानले जाते. पितरांच्या आत्मशांतीसाठी या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे.


4. धान्य 
अमावास्येला धान्य दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. बाजरी, मका, गहू, तांदूळ दान करू शकता.


5. अन्नदान 
अमावास्येच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे. यामुळे पितरांच्या आत्मा तृप्त होतो.
 

बातम्या आणखी आहेत...