आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट ऐयरवेजवर भडकली मौनी रॉय, म्हणाली - 'अशा लोकांना नोकरीवर ठेऊ नका'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही सीरियल नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय जेट ऐयरवेजवर भडकली. तिने ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आणि लिहिले, "जो पॅसेंजरला परेशान करण्याची भावना ठेवतात त्यांना नोकरीवर ठेऊ नका" झाले असे होते की, मौनी रॉयसोबत मुंबई ऐयरपोर्टवर तिकीट घेत असताना जेट ऐयरवेजचे कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केली आणि तिला मिडल सीट दिली, ज्यामुळे ती नाराज झाली आहे.  

मौनीने ट्विटरवर लिहिले...
मौनी रॉयने लिहिले आहे, 'मी बऱ्याच वर्षांपासून जेट ऐयरवेजने प्रवास करते. माझ्याकडे असेच अनेक अनुभव आहेत ज्यांना मी नजरेआड केले आहे आणि आजही माझ्याकडे एक अनुभव आहे पण मी कधी कुणासोबत चुकीच्या पद्धतीने बोलले नाही'. तिने पुढे सांगितले, 'फ्लाइटमध्ये सीट रिकाम्या असतानाही मला तुमच्या कर्मचाऱ्यांनी मिडल सीट दिली. मौनीने जेट ऐयरवेजला अशा लोकांना नोकरीवर न ठेवण्याचा सल्ला दिला आहे जे पॅसेंजरसोबत चांगले वर्तन करत नाहीत आणि त्यांना परेशान करतात. मात्र, तिने नंतर तिने ते ट्वीट डिलीटदेखील केले आहे. 

वर्क फ्रंट... 
मौनी रॉयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन स्टारर मूवी 'ब्रह्मास्त्र' मध्ये नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त मौनीजवळ आणखी दोन चित्रपट आहेत. ती राजकुमार रावसोबत फिल्म 'मेड इन चायना' आणि 'बोले चुड़ियां' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोजिट दिसणार आहे. मौनी, जॉन इब्राहमसोबत फिल्म 'रोमियो अक्बर वाल्टर' मध्ये लीड रोलमध्ये आहे. ही फिल्म 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...