आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : मौसमी चॅटर्जीची मुलगी पायल हिचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री 2 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. ती जुवेनाइल डायबिटीजने ग्रस्त होती. एप्रिल 2017 पासून एक वर्ष तिला सतत रुग्णलयात जावे लागत होते. पण जेव्हा एप्रिल 2018 मध्ये ती कोमामध्ये गेली होती. तेव्हा पती डिकी तिला आपल्या घरी घेऊन गेला होता. याच्या काही वर्षानंतर पायलचे पेरेंट्स मौसमी आणि जयंत मुखर्जीने जावयावर मुलीची व्यवस्थित काळजी न घेतल्याचा आरोप केला होता. तिने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून मुलीचा सांभाळ करण्याची मागणी केली होती.
2018 मध्ये मौसमीने याचिकेमध्ये लिहिले होते...
मौसमी आणि जयंत यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये लिहिले गेले होते कि, डिकीसोबत लग्न झाल्यानंतर पायल खूप आजारी राहात होती. मागच्यावर्षी 2017मध्ये तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. जिथे तिची आई आणि इतर फॅमिली मेंबर्स तिची काळजी घेत होते. काही महिन्यांपूर्वी कोमामध्ये असलेल्या अवस्थेत पायलला डिस्चार्ज केले गेले आणि ते खार येथील आपल्या घरीच तिच्यावर ट्रीटमेंट करून घेऊ लागले. मौसमीचा दावा होता की, यानंतर त्यांच्या कोणत्याही फॅमिली मेंबर्सला पायलला भेटू दिले जात नव्हते.
या याचिकेमध्ये हेदेखील म्हणले गेले होते की, 28 एप्रिल 2018 ला डिकीची फॅमिली पायलला घरी घेऊन गेली. डिकीने पायलची काळजी घेण्यासाठी एक नर्स ठेवली होती. डिकीला सांगितले गेले होते पायलचे डाएट आणि तिच्या फिजियोथेरपीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पण त्याने पायलची फिजियोथेरपी केली नाही आणि तिच्या डाएटमध्येही कोणताही बदलबी केला नाही. एवढेच नाही तर त्याने स्टाफचे पेमेंटदेखील थांबवले, ज्यामुळे नर्स काम सोडून निघून गेली. या प्रकरणात मौसमीने पोलिसांमध्येही तक्रार केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.