आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 मे रोजी अमावस्या आणि 7 तारखेला आहे अक्षय्य तृतीया, या महिन्यात कोणत्या खास तिथी राहतील?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2019 मधील नवीन महिना मे सुरु झाला आहे. या महिन्यात खास सण-उत्सव साजरे केले जातील. मान्यतेनुसार या खास तिथींना संबंधित देवी-देवतांची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी राहते. पंचांगानुसार जाणून घ्या, मे 2019 मधील खास तिथी आणि सण...


> शनिवार, 4 मे रोजी दर्श अमावास्या आहे. या तिथीला पितर देवतांसाठी तर्पण आणि श्राद्ध कर्म करावे. अमावास्येला धूप-दान करण्याची परंपरा आहे.
> मंगळवार, 7 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या तिथीला भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या तिथीला दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे.
> बुधवार, 8 मे रोजी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी भगवान श्रीगणेशासाठी व्रत-उपवास ठेवावा.
> सोमवार, 13 मे रोजी सीता नवमी आहे. मान्यतेनुसार या तिथीला देवी सीता धरणीतून प्रकट झाल्या होत्या. राजा जनकने सीताला मुलगी मानले होते यामुळे देवीला माता जानकी नावानेही ओळखले जाते.
> बुधवार, 15 मे रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंसाठी व्रत करावे.
> शुक्रवार, 17 मे रोजी नृसिंह चतुर्दशी आहे. या तिथीशी संबंधित मान्यतेनुसार प्राचीन काळी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला भगवान नृसिंह प्रकट झाले होते.
> शनिवार, 18 मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या तिथीला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. 
> बुधवार, 22 मे रोजी चतुर्थी व्रत आहे. या दिवशी गणपतीची विधिव्रत पूजा करावी आणि उपवास ठेवावा.
> गुरुवार, 30 मे रोजी अचला एकादशी आहे. या तिथीला भगवान विष्णूंसाठी व्रत-उपवास ठेवावा.

बातम्या आणखी आहेत...