आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mayank Agrawal Gets Chance To Replace Shikhar Dhawan In ODI Series Against West Indies

दुखापतीमुळे विंडीजविरुद्ध होणाऱ्या वन-डे सीरीजमधून शिखर धवन बाहेर, त्याच्या जागी मिळाली मयंक अग्रवालला संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 मध्ये धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळाली

स्पोर्ट डेस्क- वेस्टइंडीजविरुद्ध 15 डिसेंबरपासून होणाऱ्या वन-डे सीरीजमध्ये शिखर धवनच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी-20 सीरीजमधून बाहेर गेलेला शिखर धवन अद्याप ठीक झालेला नाहीये. टी-20 मध्ये धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती.बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सलेक्शन कमेटीने टीम मॅनेजमेंटशी चर्चा केल्यानंतरच धवच्या जागी मयंक अग्रवालची निवड केली. भारत विरुद्ध वेस्ट इंडीजचा पहिला सामना 15 डिसेंबरला चेन्नईमध्ये होईल तर दुसरा सामना 18 डिसेंबरला विशाखापट्‌टनममध्ये आणि तिसरा सामना 22 डिसेंबरला कटकमध्ये होईल.

बातम्या आणखी आहेत...