आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mayank's Double Century; After 10 Years, The Indian Opener Made A Strong Performance

मयंकचे दुहेरी शतक; १० वर्षांनी भारतीय सलामीवीराने केली दमदार कामगिरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - मयंक अग्रवाल (२१५) आणि रोहित शर्मा (१७६) यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. कसोटी इतिहासात पहिल्यांदा आपल्या दोन सलामीवीर फलंदाजांनी एका डावात १७५ पेक्षा अधिक धावा काढल्या. जगात सातव्यांदा अशी कामगिरी झाली. मयंक अग्रवालचे हे कसोटीतील पहिले शतक ठरले. कर्णधार विराट कोहली केवळ २० धावांवर परतला. त्याला डावखुरा फिरकीपटू मुथुस्वामीने बाद केले. मुथुस्वामीची ही पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ठरली. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात ७ बाद ५०२ धावांवर धाव घोषित केला. प्रत्युत्तरात दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३ बाद ३९ धावा काढल्या.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी टीम इंडियाने पहिल्या डावात बिनबाद २०२ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित ११५ आणि मयंक ८४ धावांवर नाबाद होते. रोहितने ६१ धावा जोडल्या. ताे फिरकीपटू महाराजच्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर आलेले चेतेश्वर पुजारा (६), विराट कोहली (२०), अजिंक्य राहणे (१५) आणि हनुमा विहारी (१०) मोठी खेळी करू शकले नाहीत. रवींद्र जडेजा ३० धावांवर नाबाद राहिला. डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने ५५ षटके टाकली. १८९ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मकरम (५) आणि ब्रुएन (४) यांना आश्विनने बाद केले. पीटला (०) जडेजाने टिपले. टीमने ३ बाद ३९ धावा केल्या. एल्गर २७ आणि बावुमा २ धावांवर नाबाद खेळत आहेत. टीम पहिल्या डावात अद्याप भारतापेक्षा ४६३ धावा मागे आहे. भारत त्यांना फॉलोऑन देण्याचा प्रयत्न करेल. 
 

मयंक अग्रवालने भारताकडून ५१० वे शतक झळकावले 
मयंक अग्रवालने कसोटीत पहिले शतक ठाेकले. तो भारताकडून शतक झळकावाणारा ८६ वा खेळाडू बनला. कसोटी क्रिकेटमध्ये हे भारताकडून ५१० वे शतक ठरले आहे. 
 

४८ व्या वेळी ५०० पेक्षा अधिक धावा केल्या
५०० पेक्षा अधिक धावा केल्यावर टीम इंडिया पराभूत झाली नाही. १८ सामन्यांत विजय मिळाले व २९ सामने बरोबरीत सुटले. या सामन्यातही या दोन पैकी एक निकाल अपेक्षीत आहे. 
 

मयंक शतकाला दुहेरी परावर्तित करणारा चौथा भारतीय फलंदाज 
मयंक कसाेटीत आपल्या पहिल्या कसोटी शतकाला दुहेरी शतकात बदलणारा चौथा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी १९६५ मध्ये दिलीप सरदेसाईने (२००*), १९९३ मध्ये विनोद कांबळीने (२२४) आणि २०१६ मध्ये करुण नायरने (३०३*) अशी कामगिरी केली आहे. भारताकडून कसोटीत २३ खेळाडूंनी आतापर्यंत ५२ दुहेरी शतके झळकावली आहेत.
 

तिसऱ्यांदा सलामीवीरांनी ३०० पार भागीदारी केली
रोहित व मयंकने ३१७ धावांची भागीदारी रचली. ही कसाेटीमधील आपल्या सलामीवीराची तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली. विनू मंकड व पंकज रॉयने १९५६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४१३ धावांची सर्वोच्च भागीदारी केली होती. राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवागने २००६ मध्ये सलामीवीर म्हणून पाकिस्तानविरुद्ध ४१० धावांची भागीदारी रचली.
 

तिसऱ्यांदा भारतीय सलामीवीरांच्या ३९०+ धावा 
मयंक व रोहितने मिळून एकूण ३९१ धावा काढल्या. ही भारतीय सलामीवीरकडून तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी १९५६ मध्ये सलामीवीरांनी न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ४०४ धावा आणि २००८ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध ३९२ धावा केल्या होत्या.

१९१२ मध्ये हॉब्ज व रोड्सच्या एका डावात १७५+ धावा 
खेळाडू (देश)    विरुद्ध    वर्ष    मैदान
जॅक हॉब्ज-विल्फ्रेड रोड्स (इंग्लंड)     वि. ऑस्ट्रेलिया    १९१२    मेलबर्न
बिल लॉरी-बॉब सिम्प्सन (ऑस्ट्रेलिया)     वि. वेस्ट इंडीज    १९६५    ब्रिजटाऊन
ग्लेन टर्नर-टेरी जार्विस (न्यूझीलंड)     वि. वेस्ट इंडीज    १९७२    जॉर्जटाऊन
मर्वन अटापट्टू-सनथ जयसूर्या (श्रीलंका)     वि. पाकिस्तान    २०००    कँडी
​​​​​​​ग्रीम स्मिथ-हर्षल गिब्ज (द. आफ्रिका)     वि. बांगलादेश    २००८    चटगाव
​​​​​​​मयंक अग्रवाल-रोहित शर्मा (भारत)     वि. द. आफ्रिका    २०१९    विशाखापट्टणम