आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावती-जोगींची छत्तीसगडमध्ये युती; काँग्रेसला दिला झटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला बसपच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी जोरदार झटका दिला.

 

छत्तीसगडमध्ये मायावतींनी गुरुवारी अजित जोगी यांच्या छत्तीसगड जनता काँग्रेसशी युती केली, तर राजस्थानात सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. मध्य प्रदेशातही बसपने २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.


९० सदस्यांच्या विधानसभेसाठी छत्तीसगडमध्ये जोगींचा जनता काँग्रेस पक्ष ५५, तर बसप ३५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जोगी आणि मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.  

बातम्या आणखी आहेत...