आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडे महापौरांनी पाठवला समांतरचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वादग्रस्त समांतर जलवाहिनी योजनेचे काम त्याच औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून करून घेण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाने ४ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. १० तारखेला हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी म्हटले होते. परंतु १७ सप्टेंबरपर्यंत हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आता महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत: पुन्हा नव्याने हा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बुधवारी पाठवला. 


योजनेच्या कामासाठी लागणारा २८९ कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त होण्याच्या अटीस अधीन राहून समांतरच्या पुनरुज्जीवनाचा मंजूर झालेला प्रस्ताव डॉ. निपुण यांनी सचिवांकडे प्रस्ताव पाठवला. तो गेला नसल्याने मी थेट मुख्यमंत्री तसेच त्यांचे विशेष अधिकारी प्रवीण परदेशी यांच्याकडे पुन्हा पाठवला, असे घोडेले म्हणाले. 


प्रस्ताव सचिवांकडे 
दरम्यान, आयुक्त डॉ. निपुण यांनी प्रस्ताव नगरविकास खात्याच्या सचिवांकडे पाठवला. तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याची जबाबदारी ही सचिवांची होती. परंतु तसे झाले नसल्याचे समोर आले. अर्थात थेट मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवण्याचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे डॉ. निपुण यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...