आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची औरंगाबादेत हजेरी, दहीहंडी उत्सव जल्लोषात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : गोविंदा आला रे आला.. या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दणाणून गेला होता. औरंगाबादेतही सोमवारी दुपारपासूनच चौकाचौकात महोत्सवाला सुरुवात झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गोविंदा पथकांची संख्या वाढली होती. गोविंदा पथकांनी या वर्षी सात थर लावण्याचा उपक्रम केला. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टीव्ही सेंटर, गुलमंडी, कॅनॉट, मुकुंदवाडी, गजानन महाराज मंदिर, निराला बाजार, कोकणवाडी, औरंगपुरा या भागात मोठे दहीहंडी महोत्सव झाले. हजारो औरंगाबादकरांनी हा महोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती. यातच बजरंग चौक येथे 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखने हजेरी लावली. अभिनेत्री पाहण्यासाठी औरंगाबादकरांनी गर्दी केली होती. 

 

फोटो सौजन्य- कल्याण कुलकर्णी


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मयुरी देशमुखचे फोटोज...
 

बातम्या आणखी आहेत...