आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिजीत गुरु आणि अद्वैत दादरकरच्या मुलींची धमाल, चिमुकल्या मीराने सादर केले 'बहोत हार्ड' रॅप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः आपण अनेक चॅट शो पाहिले आहेत ज्यात कलाकार मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतात. अशा कार्यक्रमांमधून कलाकारांचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर येतात. झी मराठीने नुकताच प्रेक्षकांसाठी सादर केलेला अळीमिळी गुपचिळी हा चॅट शो ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अभिनेता अतुल परचुरे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. अभिनेत्री स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील अतुलला उत्तम साथ देत आहेत.


या आठवड्यात अळीमिळी गुपचिळीच्या मंचावर 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय कार्यक्रमाचा लेखक आणि त्यात केडीची भूमिका निभावणार अभिजीत गुरु हा त्याची पत्नी समिधा गुरु आणि मुली सोबत सज्ज होणार आहे.

त्याचसोबत या कार्यक्रमातील सौमित्र म्हणजेच अभिनेता अद्वैत दादरकर, त्याची पत्नी भक्ती आणि मुलगी मीरासोबत या मंचावर हजेरी लावणार आहेत.

अभिजित गुरु याची मुलगी सुप्रसिद्ध सिनेमा 'अशी ही बनवा बनवी' मधील एक प्रसंग सादर करणार आहे, तर मीराचा निरागसपणा प्रेक्षकांना नक्कीच तिच्या प्रेमात पडणार आहे.

मीरा 'गल्लीबॉय' चित्रपटातील एक रॅप साँग गाणार आहे.

या दोन्ही मुली या मंचावर काय काय धमाल करतात हे अळीमिळी गुपचिळीच्या शुक्रवार आणि शनिवारच्या भागात प्रेक्षकांना बघता येणार आहे.