आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात दिसणार राधिकाचा थाट, घातले अस्सल सोन्याचे 50 लाख रुपयांचे दागिने, बघा राधिका-सौमित्रचा वेडिंग अल्बम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका आता रंजक वळणावर आहे. सध्या या मालिकेत राधिका आणि सौमित्र यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. ब-याच अडचणींची शर्यत पार करुन राधिका आणि सौमित्र लग्नबंधनात अडकणार आहेत. 

नुकताच झी मराठीच्या ऑफिशअल इन्स्टाग्राम पेजवर राधिका-सौमित्रच्या लग्नाचा अल्बम शेअर करण्यात आला आहे. या अल्बममध्ये दोघांच्या लग्नातील खास क्षण बघायला मिळत आहेत. नववधूच्या रुपातील राधिका अतिशय सुंदर दिसतेय. 

लाल रंगाची कांजीवरम साडी, दागदागिन्यात राधिकाचे सौंदर्य खुलून आले आहे. बाजूबंद, हार, कानातले, मांगटिका, तोडे, नथ असा दागिन्यांचा साज खास राधिकासाठी आहे. विशेष म्हणजे हे सर्व दागिने खोटे नसून अस्सल सोन्याचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, वामन हरी पेठे यांच्या या सर्व दागिन्यांची किंमत ही तब्बल 50 लाखांच्या घरात आहे.